रक्षाबंधनवेळी ए लाइन अनारकली ड्रेसचा पर्याय ट्राय करू शकता. यावर डुअल शेड्समधील ओढणीने अधिक लूक खुलला जाईल. याशिवाय ड्रेसवर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
पेस्टल रंगातील सलवार सूटचा सध्या ट्रेंड आहे. रक्षाबंधनला सिंपल आणि सोबर लूकसाठी अशाप्रकारचा ड्रेस 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
रक्षाबंधनसाठी क्लासी लूक रिक्रिएट करण्यासाठी व्हेलव्हेलट सूटचा पर्याय निवडू शकता. यावर गोल्डन रंगातील नक्षीकामामुळे सूटचा लूक अधिक खुलला जाईल. यावर गोल्डन चोकर ज्वेलरीही घालू शकता.
सध्या कफ्तान स्टाइल आउटफिट्सचा ट्रेंड आहे. वजनाने हलका असा ड्रेस खरेदी करायचा असल्यास कफ्तान स्टाइल सूटचा विचार करू शकता. हा सूट 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
रक्षाबंधनला चारचौाघांमधील अधिक सुंदर आणि उठून दिसायचे असल्यास सिक्विन वर्क करण्यात आलेला सूट खरेदी करू शकता. अशाप्रकारचा सूट ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करता येईल.
लाल रंगातील सूटवर गोल्डन रंगातील हेव्ही वर्क करण्यात आलेला सलवार सूट रक्षाबंधनसाठी परफेक्ट आहे. यावर गळ्यात चोकर ज्वेलरी घालू शकता.
सिंपल आणि हटके लूकसाठी पटियाला सूट तुम्हाला 2 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याव मोत्याची किंवा डायमंडची ज्वेलरी ट्राय करू शकता.
महिलांचा ऑल टाइम फेव्हरेट असणारा चिकनकारी सूटही रक्षाबंधनसाठी ट्राय करू शकता. यामधील तुमचा सिंपल लूक अधिक खुलून दिसेल.