MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Holi Snacks : होळीसाठी स्पेशल 1 किलो मैद्यात बनवा हे 5 कुरकुरीत पदार्थ, पाहुणेही विचारतील रेसिपी!

Holi Snacks : होळीसाठी स्पेशल 1 किलो मैद्यात बनवा हे 5 कुरकुरीत पदार्थ, पाहुणेही विचारतील रेसिपी!

Holi Snacks : होळीचा सण म्हणजे रंगांची उधळण आणि सोबतच खमंग पदार्थांची मेजवानी. घरी गोड आणि तिखट पदार्थ बनवले जातात. यंदा तुम्हाला काहीतरी सोपं आणि कुरकुरीत बनवायचं असेल, तर मैद्याच्या या 5 भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करा...

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Mar 02 2026, 07:26 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
खाऱ्या शंकरपाळ्या
Image Credit : Getty

खाऱ्या शंकरपाळ्या

खाऱ्या शंकरपाळ्या मैद्यापासून बनणारी सर्वात सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे. हे बनवण्यासाठी, मैद्यात थोडं मीठ, ओवा आणि मोहनासाठी तूप किंवा तेल घालून घट्ट पीठ मळा. नंतर पोळी लाटून त्याला डायमंड शेपमध्ये कापून घ्या. मंद आचेवर सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळा. या खाऱ्या शंकरपाळ्या चहासोबत खाण्यासाठी उत्तम आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कसूरी मेथी मठरी
Image Credit : Getty

कसूरी मेथी मठरी

कसुरी मेथी मठरी चवीला खूपच भन्नाट लागते. मैद्यामध्ये काळी मिरी, कसुरी मेथी आणि तूप घालून पीठ तयार करा. त्याचे छोटे-छोटे गोळे बनवा. त्यांना हलक्या हातांनी दाबून मंद आचेवर खरपूस तळून घ्या. ही मठरी महिनाभर आरामात टिकते.

Related Articles

Related image1
Holi Hairstyles: मोगऱ्याच्या गजऱ्यासोबत करा ५ हटके हेअरस्टाईल्स, बन आणि वेणीचे प्रकार दिसतील खास!
Related image2
Holi Hacks: होळीचे पक्के रंग काढणं झालं सोपं! ट्राय करा हे ४ घरगुती उपाय, चेहरा होईल लगेच स्वच्छ
35
भाकरवडी
Image Credit : Getty

भाकरवडी

तुम्ही मैद्यापासून गुजराती पदार्थ भाकरवडीसुद्धा बनवू शकता. मैद्यात मीठ आणि मोहन घालून पीठ चांगलं मळून घ्या. आता भाकरवडीच्या सारणासाठी भाजलेलं बेसन, तीळ, ओवा, मीठ, काळं मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण तयार करा. मैद्याची पोळी लाटून त्यात हे सारण भरा आणि त्याचा रोल बनवा. त्याचे छोटे-छोटे तुकडे करून खरपूस तळून घ्या.

45
शंकरपाळ्या
Image Credit : Getty

शंकरपाळ्या

मैद्यापासून तुम्ही शंकरपाळी (शक्करपारे) सुद्धा बनवू शकता, जे खायला खूपच चविष्ट लागतात. यासाठी मैद्यात तुपाचं मोहन घालून घट्ट पीठ मळा. शंकरपाळ्या तुपात किंवा तेलात तळून घ्या. नंतर एक तारी पाक तयार करून त्यात तळलेल्या शंकरपाळ्या टाका आणि चांगल्या प्रकारे घोळवून घ्या. त्या थंड झाल्यावर मोकळ्या करून ठेवा.

55
मैद्याची चकली
Image Credit : Getty

मैद्याची चकली

आता चकली बनवण्यासाठी तुम्हाला डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज नाही, कारण तुम्ही एका वाटी मैद्यापासूनही कुरकुरीत चकली बनवू शकता. मैदा आणि गव्हाचं पीठ समान प्रमाणात घेऊन एका कापडात बांधून वाफवून घ्या. नंतर त्यात मीठ, तिखट घालून घट्ट पीठ मळा. चकलीच्या सोऱ्यात हे पीठ भरून चकल्या पाडा आणि खरपूस तळून घ्या.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jewellery: कमी वजनाची सुंदर गोल्ड लॉकेट्स, पाहा लेटेस्ट डिझाइन्स!
Recommended image2
पावसाळ्यात असा करा वॉटरप्रुफ मेकअप, टिकेल दीर्घकाळ
Recommended image3
वर्किंग वुमनसाठी 1gm सोन्यातील ट्रेन्डी मंगळसूत्र, पाहा डिझाइन्स
Recommended image4
Smartest Zodiac Signs : या 4 राशींच्या महिलांना प्रेमात कोणीच फसवूच शकत नाही, लगेच ओळखतात तुमचं खोटं!
Recommended image5
Skin Care : 'या' फळाचा नैसर्गिक फेसपॅक, आठवड्याभरात ग्लो
Related Stories
Recommended image1
Holi Hairstyles: मोगऱ्याच्या गजऱ्यासोबत करा ५ हटके हेअरस्टाईल्स, बन आणि वेणीचे प्रकार दिसतील खास!
Recommended image2
Holi Hacks: होळीचे पक्के रंग काढणं झालं सोपं! ट्राय करा हे ४ घरगुती उपाय, चेहरा होईल लगेच स्वच्छ
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved