MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Stroke In Youth : तरुणांमध्येही वाढतोय स्ट्रोकचा धोका, ही लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा

Stroke In Youth : तरुणांमध्येही वाढतोय स्ट्रोकचा धोका, ही लक्षणं दिसल्यास वेळीच सावध व्हा

पूर्वी स्ट्रोक फक्त वयस्कर लोकांनाच होतो, असा एक समज होता. पण आता तो काळ राहिला नाही. आजकाल तरुणांमध्येही स्ट्रोकचं प्रमाण वाढताना दिसतंय.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 12 2026, 01:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका
Image Credit : Asianet News

तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका

पूर्वी स्ट्रोक हा फक्त वयस्कर लोकांचा आजार मानला जायचा, पण आता परिस्थिती बदलली आहे. तरुणांमध्येही स्ट्रोकचे प्रमाण वाढले आहे. जर रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर शरीराची एक बाजू पूर्णपणे निकामी होऊ शकते.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
स्ट्रोकचे संकेत
Image Credit : Getty

स्ट्रोकचे संकेत

स्ट्रोक येण्यापूर्वी आपलं शरीर काही संकेत देतं. ही लक्षणं दिसल्यास रुग्णाला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये न्या. मेंदूच्या एखाद्या भागात रक्तपुरवठा थांबल्यास किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटून रक्तस्त्राव झाल्यास स्ट्रोक येतो.

Related Articles

Related image1
Health Insurance : 65 वर्षांवरील आई-वडिलांसाठी पॉलिसी घेताय? या गोष्टी आवर्जुन तपासून पाहा
Related image2
Women's Health : महिलांनो, 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; स्त्री-रोगांचे आहेत संकेत
37
स्ट्रोक आल्यानंतर काय होते?
Image Credit : Getty

स्ट्रोक आल्यानंतर काय होते?

स्ट्रोक आल्यावर काही मिनिटांतच मेंदूच्या पेशी खराब होऊ लागतात. त्यामुळे त्याची लक्षणं पटकन ओळखणं गरजेचं आहे. तरुणांमध्ये स्ट्रोक येण्याचं एक मुख्य कारण म्हणजे वाढलेले लाईफस्टाईल डिसीजेस (जीवनशैलीशी संबंधित आजार).
47
कशामुळे येतो?
Image Credit : Getty

कशामुळे येतो?

उच्च रक्तदाब (High BP), मधुमेह (Diabetes), अतिरिक्त वजन, धूम्रपान, हाय कोलेस्ट्रॉल आणि काही हृदयरोग स्ट्रोकचा धोका वाढवतात. काही तरुणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील दोष यांसारखी दुर्मिळ कारणंही असू शकतात.
57
लक्षणे
Image Credit : Getty

लक्षणे

कोणत्याही कारणाशिवाय अचानक तीव्र डोकेदुखी, चालायला त्रास होणं, अचानक दृष्टी कमी होणं किंवा चक्कर येणं ही स्ट्रोकची लक्षणं असू शकतात. अनेक तरुण रुग्ण या लक्षणांना मायग्रेन, थकवा किंवा डिहायड्रेशन समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.
67
अन्य लक्षणे
Image Credit : Getty

अन्य लक्षणे

चेहऱ्याचा एक भाग वाकडा होऊ शकतो किंवा सुन्न झाल्यासारखं वाटू शकतं. तज्ज्ञांच्या मते, हे देखील स्ट्रोकचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. अचानक अशक्तपणा किंवा बधिरपणा जाणवणं, विशेषतः शरीराच्या एका बाजूला, हे सुद्धा स्ट्रोकचं लक्षण आहे.
77
काय करावे?
Image Credit : Getty

काय करावे?

अचानक दृष्टी अंधुक होणं हे आणखी एक लक्षण आहे. अनेकजण याला शुगर कमी झाल्याचं किंवा प्रेशर वाढल्याचं लक्षण समजून दुर्लक्ष करतात. पण कोणताही गैरसमज न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचानक चालताना त्रास होणे, जास्त घाम येणे, थकवा, तोल जाणे आणि मनाप्रमाणे हालचाल करता न येणे, ही सर्व स्ट्रोकची प्राथमिक लक्षणं आहेत.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
साडी असो वा लेहेंगा, मोत्यांच्या झुमक्यांनी तुमचा लुक होईल परफेक्ट!
Recommended image2
Offbeat Goa : गोवा म्हणजे फक्त बीच नाही! 'या' 12 खास जागा नक्की ट्राय करा
Recommended image3
Relationship Advice : दुसऱ्यांचे दोष लगेच दिसतात, पण नातं टिकवायचं असेल तर 'सोनं' शोधायला शिका!
Recommended image4
Horoscope 12th September 2026 : जास्त कामामुळे थकवा जाणवेल! जाणून घ्या, काय सांगतंय तुमचं आजचं राशीभविष्य
Recommended image5
Fever Bathing : ताप आल्यावर अंघोळ करावी का? जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी
Related Stories
Recommended image1
Health Insurance : 65 वर्षांवरील आई-वडिलांसाठी पॉलिसी घेताय? या गोष्टी आवर्जुन तपासून पाहा
Recommended image2
Women's Health : महिलांनो, 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; स्त्री-रोगांचे आहेत संकेत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved