MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Women's Health : महिलांनो, 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; स्त्री-रोगांचे आहेत संकेत

Women's Health : महिलांनो, 'या' लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; स्त्री-रोगांचे आहेत संकेत

एखाद्या महिलेच्या आरोग्यावर अनेक गोष्टींचा परिणाम होतो. यात हार्मोनल बदल, जीवनशैली, तिची प्रजनन क्षमता आणि एकूण आरोग्य यांचा समावेश असतो.

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 07 2026, 03:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
महिलांनो, ही लक्षणं कधीच दुर्लक्षित करू नका; स्त्री रोगविषयक समस्या असू शकतात
Image Credit : X

महिलांनो, ही लक्षणं कधीच दुर्लक्षित करू नका; स्त्री-रोगविषयक समस्या असू शकतात

हार्मोनल बदल, जीवनशैली आणि एकूण आरोग्य यासारख्या अनेक गोष्टी महिलांच्या आरोग्यावर परिणाम करतात. तरीही, अनेक महिला लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांकडे जाणं टाळतात. यामुळे अनेकदा स्त्री-रोगविषयक समस्यांकडे दुर्लक्ष होतं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
एका अभ्यासानुसार, भारतातील ७० टक्के महिलांना स्त्री-रोगविषयक समस्या आहेत
Image Credit : Asianet News

एका अभ्यासानुसार, भारतातील ७० टक्के महिलांना स्त्री-रोगविषयक समस्या आहेत

महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या मुख्य स्त्री-रोगविषयक समस्या म्हणजे मासिक पाळीतील अनियमितता आणि इन्फेक्शन. एका अभ्यासानुसार, भारतातील ७० टक्के महिलांना स्त्री-रोगांशी संबंधित समस्या आहेत. मासिक पाळीतील अनियमितता, पीसीओएस, फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस आणि पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज यांसारख्या समस्यांचा सामना बहुतांश महिलांना आयुष्यात कधी ना कधी करावा लागतो.

Related Articles

Related image1
Hydrating Fruits : शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खा 'ही' 7 फळं, उन्हाळ्यात मिळेल थंडावा
Related image2
Beauty Tips : भाजलेली हळद मिनिटांत देईल चेहऱ्यावर येईल ग्लो, फेशियलची गरजच नाही
38
मासिक पाळीच्या आरोग्यामध्ये PCOS मुळे सर्वाधिक महिला प्रभावित होतात.
Image Credit : Getty

मासिक पाळीच्या आरोग्यामध्ये PCOS मुळे सर्वाधिक महिला प्रभावित होतात.

या आजारांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे, अनेक प्रकरणं निदान आणि उपचारांशिवाय तशीच राहतात. आजाराची सुरुवातीची लक्षणं ओळखल्यास वेळेवर निदान आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होते.

48
असामान्य रक्तस्राव हे महिलांनी लक्ष देण्यासारखं एक सामान्य लक्षण आहे
Image Credit : Getty

असामान्य रक्तस्राव हे महिलांनी लक्ष देण्यासारखं एक सामान्य लक्षण आहे

असामान्य रक्तस्राव हे महिलांनी लक्ष देण्यासारखं एक सामान्य लक्षण आहे. मासिक पाळीच्या मध्येच रक्तस्त्राव होणं, लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव किंवा पाळीच्या नेहमीच्या पद्धतीत बदल होणं, या गोष्टी सामान्य नाहीत. हार्मोनल असंतुलन, फायब्रॉइड्स किंवा इन्फेक्शनमुळे हे बदल होऊ शकतात.

58
सतत ओटीपोटात दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं हे आणखी एक लक्षण आहे
Image Credit : Getty

सतत ओटीपोटात दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं हे आणखी एक लक्षण आहे

पोटाच्या खालच्या भागात (पेल्विक) सतत वेदना होणं किंवा अस्वस्थ वाटणं हे आणखी एक लक्षण आहे. पाळीच्या वेळी पोटदुखी सामान्य असली तरी, सतत होणारी पेल्विक वेदना, लैंगिक संबंधावेळी वेदना किंवा ओटीपोटात दबाव जाणवणं हे एंडोमेट्रिओसिस, अंडाशयातील गाठी किंवा पेल्विक इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं.

68
योनीमार्गातून होणाऱ्या स्रावातील बदलांकडेही महिलांनी लक्ष द्यायला हवं.
Image Credit : Getty

योनीमार्गातून होणाऱ्या स्रावातील बदलांकडेही महिलांनी लक्ष द्यायला हवं.

योनीमार्गातून होणाऱ्या स्रावातील (vaginal discharge) बदलांकडेही महिलांनी लक्ष द्यायला हवं. स्रावाचा रंग, वास, प्रमाण किंवा घट्टपणा यात बदल झाल्यास, विशेषतः खाज सुटणे किंवा जळजळ होत असल्यास, हे एखाद्या इन्फेक्शनचं किंवा शारीरिक असंतुलनाचं लक्षण असू शकतं, ज्यावर उपचार आवश्यक आहेत.

78
अनियमित पाळी, जास्त वेदना किंवा सायकलमध्ये अचानक बदल
Image Credit : Getty

अनियमित पाळी, जास्त वेदना किंवा सायकलमध्ये अचानक बदल

अनियमित पाळी, मासिक पाळीत जास्त वेदना होणं किंवा सायकलमध्ये अचानक बदल होणं, हे फक्त थायरॉईड किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) सारख्या हार्मोनल समस्यांमुळेच होत नाही. महिलांनी या लक्षणांकडेही गंभीरपणे पाहिलं पाहिजे.

88
लघवी करताना होणारा त्रास हे आणखी एक लक्षण आहे
Image Credit : Getty

लघवी करताना होणारा त्रास हे आणखी एक लक्षण आहे

लघवी करताना होणारा त्रास हे आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. वारंवार लघवीला लागणं आणि वेदना होणं हे कधीकधी स्त्री-रोगांशी संबंधित असू शकतं. जर तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागत असेल किंवा युरिन इन्फेक्शन होत असेल, तर लगेच डॉक्टरांना भेटा.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Hydrating Fruits : शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खा 'ही' 7 फळं, उन्हाळ्यात मिळेल थंडावा
Recommended image2
आजकालच्या मुलींना आवडतील अशा युनिक ब्रेसलेट डिझाइन्स!
Recommended image3
Ganesh Chaturthi 2026 : बाप्पाच्या आगमनाची तयारी! जाणून घ्या तारीख, स्थापनेचा मुहूर्त आणि विसर्जन
Recommended image4
Samosa Recipe : मैद्याशिवाय बनवा कुरकुरीत कांदा सामोसा, वाचा सोपी रेसिपी
Recommended image5
नखं मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी खा हे फूड्स
Related Stories
Recommended image1
Hydrating Fruits : शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खा 'ही' 7 फळं, उन्हाळ्यात मिळेल थंडावा
Recommended image2
Beauty Tips : भाजलेली हळद मिनिटांत देईल चेहऱ्यावर येईल ग्लो, फेशियलची गरजच नाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved