उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. काही पदार्थांनी शरीर हायड्रेट ठेवता येते. जाणून घ्या, तुम्ही तुम्हाच्या आहारात कोणते पदार्थ घालून उष्णतेमध्ये ताजेतवाने राहू शकता!
नारळ पाणी तुम्हाला उन्हाळ्यात हायड्रेटेड ठेवण्यासाठी आदर्श आहे. यामध्ये नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आहेत जे शरीराला थंड ठेवतात. नारळ पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन आणि थकवा दूर होतो.
काकडी शरीराला थंड ठेवण्यासाठी, हायड्रेटेड राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. काकडीत 95% पाणी असते, ज्यामुळे थंडावा मिळतो. पचनक्रिया सुधारणे शक्य होते. त्वचा देखील निरोगी ठेवते.
उन्हाळ्यात दही आणि ताक खाणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीर थंड राहते, आणि पोटही भरल्यासारखे वाटते. याच्या सेवनाने पचनासंबंधी समस्या दूर होतात आणि शरीराला ताजेतवाने वाटते.
पुदिना आणि कोथिंबीर शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात. तुम्ही याची चटणी बनवू शकता किंवा पुदिना लिंबू सरबत मध्ये घालून पिऊ शकता. हे पदार्थ हायड्रेटेड राहण्यासाठी उत्तम आहेत.
बेलाचे सरबत उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यास खूप प्रभावी आहे. हे अॅसिडिटीपासून आराम देणारे असून, शरीराला थंड ठेवते. बेलाचे सरबत तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि ताजेतवाने राहा!