हिंदू धर्मात 16 सोमवारच्या उपवासाला विशेष महत्व आहे. यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद येण्यासह मनासारखा जोडीदार मिळतो असे मानले जाते. हा उपवास करणार असल्यास काही नियम लक्षाच ठेवा.
16 सोमवारचा उपवास करणे अत्यंक कठीण मानले जाते. अशातच भक्तीभावाने 16 सोमवारचा उपवास करण्याचा संकल्प करा.
16 सोमवारचा उपवास मध्येच मोडू नये असे सांगितले जाते. यामुळे उपवासाचे महत्व कमी होते. याशिवाय उपवासामुळे मिळणारे फळही आयुष्यात मिळत नाही.
उपवासाच्या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची विधी-विधान पूजा प्रार्थना करावी. यानंतर पूजेच्याच ठिकाणी बसून प्रसादाचे सेवन करावे.
16 सोमवारचा उपवास ठेवला असल्यास त्यादरम्यान ब्रम्हचर्याचे पालन करावे. चुकूनही सोमवारी घरात तामसिक भोजन करू नये.
सोमवारी उपवासाच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करावा. यावेळी पाण्यात मध, दही आणि दूध मिक्स करा. यामुळे शुभ फळ मिळते.
सोमवारचा उपवास करताना पूजा करण्यासाठी एकच वेळ निवडावी. यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या पूजेची वेळ निश्चित करा.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.