इंटरमिटेंट फास्टिंग’ केल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका? काय सांगतात तज्ज्ञ...

| Published : Mar 22 2024, 06:17 PM IST

hearth attack

सार

अनेकजण वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेस ठेवण्यासाठी अधूनमधून उपवास करतात मात्र हा उपवास तुमच्या जीवावर उठू शकतो. असे तज्ञांनी मत व्यक्त केले. या इंटरमिटेंट उपवासामुळे रक्तवाहिन्यांसंबंधित विकार किंवा हार्ट अटॅकचा धोका वाढतो असे ते म्हणाले आहेत.

दिल्ली :  सध्याच्या जीवनशैलीत खूप सारे बदल झाले आहेत. जेवण,झोप, व्यायाम याकडे अनेकांचे लक्ष नाही.तसेच सध्या कामाच्या पद्धती देखील बदलल्या आहेत, त्यामुळे तसं तास एकाच जागी बसने आणि काम करावे लागते. त्यामुळे अनाहूतपणे वजन वाढते आणि लठ्ठपणा येतो. हा लठ्ठपणा अनेकांची डोकेदुखी होत असल्याने त्याला कमी करण्यासाठी काही लोक डाएट करतात तर काही जिममध्ये जातात. मात्र आजकाल नवीनच ट्रेंड निघाला आहे तो म्हणजे ‘इंटरमिटेंट फास्टिंग’चा. यामध्ये अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी उपवास ठेवला जातो. यातून वजनही कमी होते. मात्र नुकताच एका राष्ट्रीय परिषदेत तज्ञांच्या म्हणण्यानुसार ‘इंटरमिटेंट फास्टिंग'मुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित विकार झाल्यास मृत्यूचा धोका 91% वाढतो, असे या अभ्यासात समोर आले आहे.

तसेच यावेळी नवी दिल्लीतील फोर्टिस सी-डॉक हॉस्पिटल फॉर डायबिटीज अँड अलाईड सायन्सेसचे अध्यक्ष अनुप मिश्रा यांनी काही स्पष्टीकरण दिले. “हा प्रकार लोकप्रिय होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे लोकांचा असा विश्वास आहे की, ते आठ तासांच्या कलावधीत त्यांना जे आवडेल ते खाऊ शकतात. दिवसातून आठ तासात पिझ्झा आणि बर्गर खाणे हे आरोग्यदायी नाही”, असे डॉ. मिश्रा म्हणाले.

इंटरमिटेंट फास्टिंग’ म्हणजे काय ?

‘इंटरमिटेंट फास्टिंग’मध्ये तुम्ही दिवसातल्या काही ठराविक तासांमध्ये आहार घेऊ शकता. दिवसातील आठ ते 12 तासांच्या कालावधीतच तुम्ही आहार घेऊ शकता. या वेळेव्यतिरिक्त दिवसभर उपवास केला जातो. एखादी वेळ ठरवून तुम्ही आहार घेतला, त्यानंतर तुम्हाला बरेच तास काही खाता येत नाही. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’मध्ये 16/8 असं एक गणित आहे. त्यानुसार तुम्ही दिवसातले 16 तास खाण्यापासून दूर राहता आणि उरलेल्या 8 तासांतच काही खाऊ शकता.

‘इंटरमिटेंट फास्टिंग’चे काही सकारात्मक परिणाम आहे का ?

हल्लीच्या काळात याचे ट्रेंड आल्यामुळे अनेक अभ्यास यावर केले गेले असून काही पॉसिटीव्ह बाबी देखील समोर आल्या आहेत. फास्टिंग’मुळे चरबी कमी होण्यास मदत होते, पचन सुधारते, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.तसेच हेउपवास स्मृतिभ्रंशासाठी देखील हे फायद्याचे ठरत असल्याचे तज्ञ सांगतात.तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांवर ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ केल्याने नेमका काय परिणाम होतो, यावर अद्याप कोणताही अभ्यास झालेला नाही.

आणखी वाचा :

ज्या देशात दहशतवादी हल्ले आणि आर्थिक मंदी तरीही भारतापेक्षा अधिक आनंदी

Gudi Padwa 2024 : यंदा गुढीपाडवा कधी? जाणून घ्या शुभू मुहूर्तासह पूजा-विधी

Holashtak 2024 : यंदा होलाष्टक कधी? या काळात शुभ कार्य करणे असते वर्ज्य