सार

Diwali Padwa 2024 : कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी म्हणजेच लक्ष्मी पूजन केले जाते. याच्याच दुसऱ्या दिवशी कार्तिक शुक्ल प्रतिपदेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. यंदा दिवाळी पाडवा कधी आणि महत्व जाणून घेऊया. 

Diwali Padwa 2024 : यंदा 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी लक्ष्मी पूजनही केले जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. पती-पत्नीच्या नात्यातील अतूट प्रेमाच्या या सणाला फार महत्व आहे. या दिवशी पत्नीकडून पतीची आरती करण्यासह त्याच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. 

बलिप्रतिदेच्या दिवशी बळीची पंचरंगात रांगोळी काढून पूजा केली जाते. यावेळी इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणत प्रार्थना केली जाते. याशिवाय दिवाळी पाडव्याचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दिवाळी पाडव्याचे महत्व जाणून घेऊया.

बलिप्रतिपदा पाडव्याचे महत्त्व:
बलिप्रतिपदा पाडवा हा एक हिंदू सण आहे. जो वाईटावर चांगल्याचा विजय आणि अन्यायावर सत्याचा विजय साजरा करतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असतो. या दिवशी गोवर्धन पूजा देखील करतात. या दिवशी अभंग स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. या दिवशी सोने खरेदी, सुवासणीकडुन पतीस औक्षण, व्यापारांच्या वर्षाचा प्रारंभ केला जातो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेट वस्तू देतो. नवविवाहित दापंत्यासाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी सासरी करतात. याला दिवाळसन म्हणतात. यानिमित्ताने जावयास सासरच्याकडून निमंत्रण दिले जाते. नंतर स्वादिष्ट जेवण बनवून जावयास खाऊ घातले जाते. आणि नंतर त्यास आहेर दिला जातो. तत्पूर्वी पत्नी आपल्या पतीला तेल आणि उटणे लावून मालिश करते आणि स्नान घालते. आणि स्नान झाल्यावर पतीचे औक्षण करते.

हा सण राजा बळीच्या कथेचे स्मरण करतो. एक परोपकारी शासक ज्याला देव विष्णूनी पाताळात गाडले होते. तथापि विष्णू बळीची नम्रता आणि भक्ती पाहून प्रभावित होतात आणि ते त्याला वरदान देतात की दरवर्षी बलिप्रतिपदा पाडव्याला पृथ्वीवर तुझी पूजा केली जाईल तसेच तुझे स्मरण केले जाईल.

आणखी वाचा : 

दिवाळीत मावशीला गिफ्ट करा Hema Malini सारख्या 8 साड्या, खुलेल लूक

दिवाळी पाडव्याला बायकोला गिफ्ट देण्यासाठी 7 Gift Ideas, होईल खुश