महिलांना मेकअप करणे आवडते. अशातच सध्या वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ब्युटी प्लॅटफॉर्मवर सुरु असणाऱ्या सेलचा फायदा घेत बायकोसाठी मेकअप किट खरेदी करू शकता.
एथनिक आउटफिट्सवर महिला आवर्जुन बांगड्या घालतात. यामुळे यंदाच्या दिवाळीला बायकोला कुंदन चुडा सेट गिफ्ट करू शकता.
महिलांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी असतात. त्या व्यवस्थितीत ठेवण्यासाठी ज्वेलरी बॉक्सचा वापर केला जातो. अशातच बायकोला तिच्या ज्वेलरींसाठी बॉक्स खरेदी करून देऊ शकता.
बायकोसाठी यंदाच्या दिवाळी पाडव्याला कस्टमाइज अशी उशी गिफ्ट करु शकता. यावर खास मेसेज किंवा दोघांचे फोटो लावून सजवू शकता.
पहिलाच दिवाळी पाडवा साजरा करणार असल्यास बायकोला गोल्ड प्लेटेड सिल्व्हर ब्रेसलेट गिफ्ट करू शकता.
बायकोला यंदाच्या दिवाळी पाडव्याला गिफ्ट म्हणून टिश्यू ऑर्गेंजा बनारसी साडी द्या. 2 हजार रुपयांपर्यंत अशाप्रकारची साडी खरेदी करता येईल.
एखाद्या फंक्शनला जाताना साडी अथवा एथनिक आउटफिट्सवर शोभेल अशी पोटली बॅग दिवाळी पाडव्याला बायकोला गिफ्ट करू शकता. 500 रुपयांपर्यंत अशाप्रकारची पोटली बॅग मार्केटमध्ये खरेदी करता येईल.