सार

अयोध्येत दाखल होण्यासाठी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून एक खास अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून 22 भाषांमध्ये तुम्हाला राम नगरीबद्दलची माहिती मिळणार आहे.

Ayodhya Ram Mandir :  येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देश-विदेशातून पाहुणे अयोध्येत दाखल होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर भाविकांना रामललांचे दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले केले जाणार आहे. अशातच तुम्ही अयोध्येला जाण्याचा विचार करत असल्यास गुगल प्ले स्टोअरवरील एक मोबाइल अ‍ॅप नक्कीच तुमच्या फोनमध्ये आताच डाउनलोड करून ठेवा. जेणेकरुन अयोध्येत आल्यानंतर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

दिव्य अयोध्या मोबाइल अ‍ॅप
अयोध्येला जाण्याआधी तुम्ही फोनमध्ये दिव्य अयोध्या मोबाइल अ‍ॅप (Divya Ayodhya Mobile App) डाउनलोड करून घ्या. सरकारकडूनच हा अ‍ॅप लाँच करण्यात आला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला अयोध्येतील संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

अ‍ॅपमध्ये मिळणार या सुविधा
22 जानेवारीला मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. अशातच दिव्य अयोध्या मोबाइल अ‍ॅप तुमची मदत करेल. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही हॉटेल बुकिंग, ऑनलाइन पार्किंग बुकिंग किंवा गाइडची हेल्प अशा वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

अ‍ॅपची खासियत
दिव्य मोबाइल अ‍ॅपमध्ये 22 भाषांचा समावेश करण्यात आला आहे. अ‍ॅन्ड्रॉइड फोनधारकांना गुगल प्ले स्टोअरमधून (Google Play Store) अ‍ॅप डाउनलोड करता येणार आहे. प्ले स्टोअरवर दिव्य अ‍ॅप सर्च केल्यानंतर एक लिंक दाखवली जाईल त्यावर क्लिक करून अ‍ॅप डाउनलोड करू शकता. यानंतर तुम्ही अयोध्येत येण्यासाठी प्रत्येक प्रकारची माहिती अ‍ॅपच्या माध्यमातून सहज मिळवू शकता.

आणखी वाचा : 

राम मंदिरासाठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा हातभार, या गोष्टी केल्यात दान

राम यंत्रावर स्थापन केली जाणार रामललांची मूर्ती, जाणून घ्या यंत्राबद्दल अधिक

या कलाकारांचा अयोध्येतील आहे जन्म, अनुष्का शर्माचाही समावेश