Entertainment

Bollywood

या कलाकारांचा अयोध्येतील आहे जन्म, अनुष्का शर्माचाही समावेश

Image credits: Social Media

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, सिनेसृष्टीतील काही कलाकारांचा जन्म अयोध्येतील आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक....

Image credits: Social Media

पूजा बत्रा

90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा बत्रा उत्तर प्रदेशातील अयोध्येतील आहे.

Image credits: Social Media

अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्माचा जन्म प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्येत झाला आहे. अनुष्काच्या जन्मावेळी तिचे वडील अयोध्येत भारतीय सैन्यातील डोगरा रेजीमेंटचा हिस्सा होते.

Image credits: Social Media

लावण्या त्रिपाठी

साउथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री लावण्या त्रिपाठीचा जन्म अयोध्येत झाला आहे. काही वर्ष अयोध्येत राहिल्यानंतर लावण्याचा परिवार देहरादून येथे राहण्यास आला.

Image credits: Social Media

अबरार अल्वी

'प्यासा', 'कागज के फूल',' साहिब बीबी और गुलाम' सारख्या सिनेमांचे लेखक अबरार अल्वी यांचा जन्म अयोध्येत झाला होता.

Image credits: Social Media

अभिषेक चौबे

प्रसिद्ध दिग्दर्शक अभिषेक चौबे यांचा जन्म अयोध्येत झाला आहे. अभिषेक यांनी 'इश्किया' सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

Image credits: Social Media