मधुमेहाच्या रुग्णांना या 5 गोष्टी माहित असाव्यात, रहाल फिट

| Published : Sep 26 2024, 09:36 AM IST

Diabetes

सार

मधुमेह असा आजार आहे ज्यावर ठोस उपचार नाही. पण मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोजच्या लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. अशातच मधुमेहाच्या रुग्णांना कोणत्या गोष्टी माहिती असाव्यात याबद्दल जाणून घेऊया.

Diabetes and Health Care : मधुमेह एक गंभीर आजार असून सध्या बहुतांशजणांना याची लागण होताना दिसून येते. मधुमेह होण्यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. याआधी वयाने अधिक असलेल्या व्यक्तींना मधुमेहाची समस्या उद्भवायची. पण आता लहान मुलं आणि तरुण वर्गालाही मधुमेहाचा आजार होत आहे. काहींना मुधमेह होतो पण त्यासंदर्भातील माहितीच्या अभावामुळे त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हे माहिती नसते. अशातच पुढील काही 5 गोष्टी जाणून घेऊया ज्याबद्दल प्रत्येक मधुमेहाच्या रुग्णाला माहिती असणे आवश्यक आहे.

मधुमेह होण्याची मुख्य कारणे
मधुमेह लाइफस्टाइलसंबंधित आजार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे बिघडलेली लाइफस्टाइल, अनहेल्दी फूड्सचे सेवन, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी न करणे आणि तणाव. याशिवाय ज्या परिवारात आधीच एखाद्याला मधुमेह झाला असल्यास दुसऱ्या व्यक्तीलाही होण्याची शक्यता आहे. अनुवांशिक रुपातही मधुमेह होऊ शकतो. जर तुमचे वजन अधिक असल्यास तरीही मधुमेहाचा सामना करावा लागू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांना माहिती असाव्यात या गोष्टी

  • मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी त्यावर ठोस असा उपचार नाही. यामुळे योग्य डाएट आणि लाइफस्टाइलमध्ये बदल करुन मधुमेहावर नियंत्रण मिळवू शकता.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज रक्तातील साखरेचे प्रमाण तपासून पहावे. यामुळे कळू शकते की, कोणते खाद्यपदार्थ रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय ग्लुकोज मीटरच्या मदतीने रक्तातील साखर तपासून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • मधुमेहाच्या रुग्णांना फळांच्या ज्यूस पिण्याएवजी फळे खावीत. कारण ज्यूसमध्ये फायबरचे प्रमाण कमी होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायबरची आवश्यकता असते. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांना पाकिटबंद ज्यूसचे सेवन करणे टाळावे. यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी तणावापासून दूर रहावे असा सल्ला वेळोवेळी दिला जातो. तणावामुळे देखील रक्तातील साखर वाढली जाऊ शकते. यामुळे रुग्णांना मेडिटेशन, योगा अशा हलक्या स्वरुपाच्या एक्सरसाइज कराव्यात.
  • मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी केवळ लो ग्लाइमेसिक इंडेक्स असणाऱ्या फळांचे सेवन करावे. जेणेकरुन रक्तातील साखर वाढली जाणार नाही.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

High Blood Pressure असणाऱ्या व्यक्तींनी कोणती फळे खावी?

डोकेदुखीच्या समस्येवर Painkiller च्या गोळ्या घेता? आरोग्यावर होतील दुष्परिणाम