Marathi

High Blood Pressure असणाऱ्या व्यक्तींनी कोणती फळे खावी?

Marathi

उच्च रक्तदाबाची समस्या

उच्च रक्तदाबाची समस्या सध्या सर्वसामान्य झाली आहे. यामागील कारण म्हणजे बिघडलेली लाइफस्टाइल. परिणामी हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकसारख्या समस्या उद्भवल्या जातात.

Image credits: social media
Marathi

आरोग्याची घ्या काळजी

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण काही फळांबद्दल जाणून घेणार आहोत जी उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी खावीत.

Image credits: Facebook
Marathi

किवी

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी किवीचे सेवन करावे. किवीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. किवीचा ज्यूसही पिऊ शकता.

Image credits: Facebook
Marathi

कलिंगड

कलिंगडात अ‍ॅमिनो अ‍ॅसिड,पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे पोषण तत्त्वे असतात. यामुळे उच्च रक्तदाबाची स्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Image credits: Facebook
Marathi

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते. यामधील पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Image credits: facebook
Marathi

केळ

केळ्यातही उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे गुणधर्म असतात. केळ्यात पोटॅशियम, ओमेगा-3, फॅटी अ‍ॅसिड असे गुणधर्म असतात. याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Image credits: facebook
Marathi

रताळ

रताळ्यामध्ये कॅरोटीन, कॅल्शियम आणि फायबर असल्याने तणावाची स्थिती कमी करण्यासह उच्च रक्तदाबही नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Image credits: facebook
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik

सिद्धिविनायक ते श्री मुंबादेवी...मुंबईतील 10 प्रसिद्ध मंदिरे

लेहेंगा-साडीला विसरून नवरात्रीत ट्राय करा, जबरदस्त Indo Western Dress

सोने-चांदी तुम्ही विसरुन जा, परिधान करा Zircon Necklace Designs

ऑक्टोबर महिन्यात 'या' तारखेला सुरु होणार नवरात्र, तिथी घ्या जाणून