सार

Devshayani Ekadashi 2024 : एकादशीच्या व्रतावेळी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा-प्रार्थना केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. यंदाच्या देवशयनी एकादशीची पूजा, विधी, शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया अधिक...

Devshayani Ekadashi 2024 Puja-Vidhi : एकादशीची तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा-प्रार्थना केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. पुराणांनुसार, देवशयनी एकादशीपासून पुढील चार महिन्यांसाठी भगवान विष्णून निद्राव्यस्थेत जातात. यामुळे कोणतेही शुभ आणि मंगलकार्ये पार पाडली जात नाही. यादरम्यान, संपूर्ण सृष्टीचे संचालन भगवान शंकरांकडून केले जाते. यंदा देवशयनी एकादशी 17 जुलैला साजरी केली जाणार आहे.

देवशयनी एकादशी शुभ मुहूर्त
देवशयनी एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8 वाजून 33 मिनिटांनी सुरु होणार असून 17 जुलैला रात्री 9 वाजून 02 मिनिटांनी संपणार आहे.

देवशयनी एकादशी व्रत पारायण मुहूर्त
देवशयनी एकादशीचे व्रत पारायण 18 जुलैला सकाळी 5 वाजून 34 मिनिटांपासून ते सकाळी 08 वाजून 19 मिनिटांपर्यंत करता येऊ शकते.

देवशयनीच्या दिवशी अशी करा पूजा

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे
  • घरातील देव्हाऱ्यात दिवा लावावा
  • भगवान विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करावा
  • भगवान विष्णूंना फुल आणि तुळस अर्पण करावी
  • शक्य असल्यास उपवासही ठेवू शकता
  • भगवान विष्णूंची आरती करा
  • भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवा
  • देवशयनी एकादशीनिमित्त भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची देखील पूजा करा.

देवशयनी एकादशीचे महत्व
देवशयनी एकादशीला व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपमधून मुक्ती मिळते असे मानले जाते. भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. धार्मिक मान्यतांनुसार, एकादशीचे व्रत ठेवल्याने व्यक्तीला सर्व सुख मिळतात आणि जीवनाचा शेवट मोक्षाने होतो.

भगवान विष्णू निद्राव्यस्थेतून कधी उठणार?
17 जुलैला असणाऱ्या देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू निद्राव्यस्थेत जाणार आहेत. यानंतर कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षाच्या देवप्रबोधिनी एकादशी वेळी योगनिद्रेतून जागे होणार आहेत. यंदा देवप्रबोधिनी एकादशी 12 नोव्हेंबरला आहे. याच दिवसानंतर चातुर्मासही संपणार असून विवाह आणि शुभ मुहर्त सुरु होणार आहेत.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

17 जुलैला असणाऱ्या देवशयनी एकादशीला करा हे 5 उपाय, पालटेल नशीब

आषाढ महिन्यातील उपवासासाठी 7 खास पदार्थ, नक्की ट्राय करा