17 जुलैला देवशयनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास नशीब पालटण्यासह तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होतील. याच उपायांबद्दल जाणून घेऊया...
देशवशयनी एकादशीच्यानिमित्त तुळशीची पूजा करा. याशिवाय तुळशीच्या रोपासमोर तूपाचा दिवा लावा. यामुळे आयुष्यात आनंद आणि सुख-समृद्धी येईल.
देवशयनी एकादशीला भगवान विष्णूला केशरयुक्त खीरचा नैवेद्य दाखवा. यावर तुळशीचे पानही ठेवा. यामुळे वैवाहिक आयुष्य आनंदी राहते असे मानले जाते.
एकादशीच्या तिथीनिमित्त दान करण्याचे विशेष महत्व आहे. या दिवशी गरजूंना भोजन, धान्य, कपडे अथवा भांड्यांचे दान करा. शक्य असल्यास पैशांची देखील मदत करू शकता.
देवशयनी एकादशीनिमित्त भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जाप करा. पण मंत्रांचा जाप करण्याआधी एखाद्या पंडितांचा सल्ला देखील घ्या.
देवशयनी एकादशीनिमित्त भगवान विष्णूंची पूजा करा. यावेळी विष्णूंना पिवळ्या रंगातील फुल, वस्र अर्पण करा. यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी नेहमीच टिकून राहते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.