उपवासासाठी बहुतांशजणांच्या घरात साबुदाण्याची खिचडी तयार केली जाते. यासाठी साबुदाणे, शेंगदाणे, कोथिंबीर, मिरचीचा वापर केला जातो.
उपवासाला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर फराळी मिसळ ट्राय करू शकता. या रेसिपीसाठी शेंगदाण्याची आमटी आणि फराळी चिवड्याचा वापर केला जातो.
उपवासाला राजगिऱ्याच्या पीठापासून तयार केलेले पदार्थ तयार केले जातात. आषाढ महिन्यातील उपवासासाठी तुम्ही राजगिऱ्याचे थालीपीठ तयार करू शकता.
उपवासाला चमचमीत खायचे असल्यास फराळी पॅटिस तयार करू शकता. यासाठी उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, मिरची, कोथिंबीर आणि राजगिऱ्याच्या पीठाचा वापर करू शकता.
उपवासाची इटली तयार करण्यासाठी वरीचा वापर केला जातो. इटली तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
उपवासाला वरीचा भात बहुतांशजणांना खायला आवडतो. प्रत्येकाची वरीचा भात करण्याची पद्धत वेगवेगळी असते. वरीच्या भातासोबत शेंगदाण्याची आमटी खाऊ शकता.
उपवासाची बटाट्याची भाजी देखील कोणत्याही उपवासाला तयार केली जाते. या भाजीसोबत राजगिऱ्याच्या पीठापासून तयार केलेल्या पुऱ्यांचा आस्वाद घेऊ शकता.