- Home
- lifestyle
- Daily Horoscope Aug 18 : आज सोमवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांचे आर्थिक प्रश्न सुटतील!
Daily Horoscope Aug 18 : आज सोमवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांचे आर्थिक प्रश्न सुटतील!
मुंबई - १८ ऑगस्ट २०२५ रोजी हर्षण, आनंद, सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी असे ४ शुभ योग तर वज्र आणि कालदंड असे २ अशुभ योग तयार होतील. याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. वाचा आजचे राशिभविष्य.

१८ ऑगस्ट २०२५, सोमवार राशिभविष्य:
मेष राशीच्या लोकांचा एखाद्याशी वाद होऊ शकतो, लव्ह लाईफही ठीक राहणार नाही. वृषभ राशीच्या लोकांना संततीसुख लाभेल, पण व्यवसायात धोका घेऊ नये. मिथुन राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे, व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. कर्क राशीच्या लोकांनी वाहन काळजीपूर्वक चालवावे, अपघात किंवा दुखापत होऊ शकते. पुढे वाचा सविस्तर राशिभविष्य…
मेष राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
या राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफमध्ये एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचे आगमन होऊ शकते. नोकरीसंबंधी घरी मोठा वाद उद्भवू शकतो. व्यवसायाशी संबंधित मिटिंगमध्ये तुमच्याविरुद्ध चर्चा होऊ शकते. शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. नातेवाईकांशी वाद होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
या राशीच्या लोकांना संततीसुख लाभू शकते. जोडीदारासोबत कुठेतरी सहलीला जाऊ शकता. तुमचा एखादा गुपित उघड होऊ शकतो. व्यवसायात मोठा धोका घेण्याचे टाळा, अन्यथा तोटा होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या, जुन्या आजारांनी त्रास होऊ शकतो.
मिथुन राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
नोकरीत सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायासाठी दिवस शुभ आहे. मित्र व नातेवाईकांचा सहयोग मिळेल. इतरांच्या बोलण्यात येऊन निर्णय घेण्याचे टाळा. प्रेमसंबंधात यश मिळू शकते. वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
कर्क राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
पैसा कमवण्यासाठी शॉर्टकट वापरू नका, अन्यथा परिस्थिती बिघडेल. वाहन काळजीपूर्वक वापरा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, हंगामी आजारांपासून सावध राहा. आर्थिक प्रश्न सुटू शकतात. लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहील.
सिंह राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
एखादी जुनी चूक आज त्रास देऊ शकते. अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका. पैशांच्या व्यवहारात गोंधळ होण्याची शक्यता आहे. महागड्या वस्तूंवर जास्त खर्च होईल, ज्यामुळे बजेट बिघडेल. नोकरीत टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव राहील.
कन्या राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
आज अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. मालमत्तेसंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी असुविधा जाणवेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांपासून दूर राहा.
तूळ राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
व्यवसायात मोठी योजना यशस्वी होऊ शकते. जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा मिळेल. काही चांगल्या लोकांची भेट होईल, जे भविष्यात उपयुक्त ठरतील. भावंडांकडून आर्थिक सहाय्य मिळेल. शत्रूं पासून जितके दूर राहाल तितके चांगले.
वृश्चिक राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
काही लोक वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्हाला त्रास देऊ शकतात. कुटुंबात अचानक एखाद्याची तब्येत बिघडू शकते. कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात चढउतार राहतील. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
धनु राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक नुकसान होऊ शकते. इतरांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका. नोकरीत टार्गेटसाठी अधिकारी दबाव आणतील, ज्यामुळे तणाव येऊ शकतो. सासरच्या मंडळींकडून एखादी वाईट बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
या राशीच्या लोकांना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मसालेदार अन्नामुळे पोटदुखी किंवा आजार उद्भवू शकतात. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. आईवडिलांचा सहयोग मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये तडा जाऊ शकतो. मुलांवर लक्ष ठेवा.
कुंभ राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
आज एखाद्या प्रोजेक्टसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. खोटे बोलणे टाळा. राजकारणाशी संबंधित लोक एखाद्या कटाचे बळी होऊ शकतात. आधी केलेल्या चांगल्या कामांचे फळ आज मिळेल. संततीकडून मोठी खुशखबर मिळेल.
मीन राशिभविष्य (१८ ऑगस्ट २०२५)
नोकरीत प्रमोशनची संधी आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या, अन्यथा हंगामी आजारांचा त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे. धर्म-कर्माच्या कामात मन लागेल. मानसिक शांतीचा अनुभव येईल.
