Horoscope 30th June 2026 : ३० जून, मंगळवारी आषाढ महिन्याचा पहिला दिवस आहे. या दिवशी दिवसभर ३ शुभ योग जुळून येत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल.

Horoscope 30th June 2026 : ३० जून २०२६, मंगळवारचा दिवस खास आहे. या दिवशी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. दिवसभर ब्रह्म, इंद्र आणि मित्र असे तीन शुभ योग जुळून येत आहेत. इतकंच नाही, तर मंगळवारी कर्क राशीत असलेला बुध ग्रह वक्री होणार आहे, म्हणजेच तो उलटी चाल चालेल. या सगळ्याचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल? चला जाणून घेऊया…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मेष राशीभविष्य ३० जून २०२६ (Mesh Rashifal)

आज कामाच्या ठिकाणी तुमची हुशारी सगळ्यांच्या नजरेत येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. एखादी नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. नुकत्याच हाती घेतलेल्या कामात चांगली प्रगती दिसेल. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल. जुन्या मित्राशी अचानक भेट होऊ शकते.

वृषभ राशीभविष्य ३० जून २०२६ (Vrishabha Rashifal)

आज संयम ठेवणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. छोट्या-छोट्या गोष्टींवरून ताण घेऊ नका. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास नात्यात अधिक घट्टपणा येईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवल्यास फायदा होईल. आरोग्य सामान्य राहील.

मिथुन राशीभविष्य ३० जून २०२६ (Mithun Rashifal)

तुमच्या लव्ह लाईफमध्ये गोडवा टिकून राहील. एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यापार करणाऱ्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन लागेल आणि परदेशात किंवा उच्च शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकतं.

कर्क राशीभविष्य ३० जून २०२६ (Kark Rashifal)

आज नवीन योजनेवर काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं मार्गी लागतील. सेल्स, मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबात तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह राशीभविष्य ३० जून २०२६ (Sinha Rashifal)

प्रेमसंबंधात पुढे जाण्याची संधी मिळेल. लग्नाची बोलणी सुरू असेल तर कुटुंबाची संमती मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणात फायदा होऊ शकतो. मुलांच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. ऑनलाइन काम करणाऱ्यांचं उत्पन्न वाढू शकतं.

कन्या राशीभविष्य ३० जून २०२६ (Kanya Rashifal)

कोणतेही कायदेशीर किंवा अधिकृत कागदपत्र न वाचता पुढे पाठवू नका. कामाच्या ठिकाणी कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणं नुकसानीचं ठरू शकतं. कुटुंबात सामान्य वातावरण राहील, पण बोलताना शब्दांची निवड विचारपूर्वक करा.

तूळ राशीभविष्य ३० जून २०२६ (Tula Rashifal)

जोडीदारासोबत घालवलेला वेळ नात्याला अधिक घट्ट करेल. क्रिएटिव्ह कामांमध्ये यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवीन यश मिळू शकतं.

वृश्चिक राशीभविष्य ३० जून २०२६ (Vrishchik Rashifal)

व्यवसायात एखादी नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकते. कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी होणारी ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल. मुलांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आरोग्य चांगलं राहील. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होतील आणि नातं अधिक घट्ट होईल.

धनु राशीभविष्य ३० जून २०२६ (Dhanu Rashifal)

आज तुमचा आत्मविश्वास शिगेला पोहोचलेला असेल. शिक्षण आणि करिअरबाबत केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखकर राहील. नवीन विचार स्वीकारल्यास भविष्यात फायदा होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होणारी भेट फायदेशीर ठरू शकते.

मकर राशीभविष्य ३० जून २०२६ (Makar Rashifal)

मालमत्तेशी संबंधित प्रकरणात घाई करणं योग्य ठरणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार सध्या टाळलेलाच बरा. घरातील खर्च वाढू शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करूनच चाला. मेहनतीचं फळ नक्की मिळेल, पण थोडी वाट पाहावी लागेल.

कुंभ राशीभविष्य ३० जून २०२६ (Kumbh Rashifal)

आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. विवाहयोग्य लोकांना चांगलं स्थळ मिळू शकतं. जुने वाद चर्चेतून मिटू शकतात. व्यवसायात केलेले नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. घरातील वातावरण सकारात्मक राहील आणि बहुतेक कामं वेळेवर पूर्ण होतील.

मीन राशीभविष्य ३० जून २०२६ (Meen Rashifal)

आज तुमचं संपूर्ण लक्ष स्वतःवर असेल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. व्यवसायात धोका पत्करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा विचार करा. संयम आणि समजूतदारपणाने घेतलेले निर्णय भविष्यात चांगले परिणाम देतील. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं राहील.


Disclaimer : या लेखात दिलेली माहिती ही धार्मिक ग्रंथ, विद्वान आणि ज्योतिषांच्या मतांवर आधारित आहे. आम्ही केवळ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. वाचकांनी याकडे केवळ माहिती म्हणूनच पाहावे.