Christmas 2024 निमित्त मित्रपरिवाराला Messages, Wishes पाठवून साजरा करा सण

| Published : Dec 24 2024, 11:56 AM IST

Christmas 2024 Wishes in Marathi

सार

Christmas 2024 Wishes : येत्या 25 डिसेंबरला नाताळचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी सांताक्लॉजची थीम ठेवत सणाचे सेलिब्रेशन केले जाते. यंदाच्या नाताळच्या सणावेळी मित्रपरिवाराला पुढील काही Messages, Images आणि शुभेच्छापत्र पाठवा. 

Christmas 2024 Wishes in Marathi : येत्या 25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस डे म्हणजेच नाताळचा सण साजरा केला जाणार आहे. खरंतर, ख्रिस्ती बांधवांचा नाताळ हा प्रमुख सण असून आता प्रत्येकजण तो साजरा करतात. या दिवशी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली जाते. याशिवाय घराला सजावट, ख्रिसमस ट्री आणि केक कापून मित्रपरिवारासोबत सणाचा आनंद द्विगुणीत केला जातो. अशातच यंदाच्या ख्रिसमस डे निमित्त खास Messages, Wishes, Images पाठवून सण साजरा करू शकता.

नाताळाचा सण,

सुखाची उधळण

मेरी ख्रिसमस!

तुम्हाला व कुटुंबियांना

ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा...

प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो...

ख्रिसमसनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…

प्रेम, सत्य, दया, संदेश देणारा

नाताळ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात

मागूया साऱ्या चुकांची माफी मनात

सर्वांना सुखी कर ही कामना उरात

मदत हाच धर्म गाणे गाऊ सुरात

नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

आला सांताक्लॉज घेऊन शुभेच्छा हजार

चिमुकल्यांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार

तुमच्यासाठीही खास होवो हा आनंदाचा सण वारंवार

सारा आनंद, सगळं सौख्य

होवो तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता,

यशाची सारी शिखरं, ऐश्वर्य हे तुम्हांला मिळो याच नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

आणखी वाचा : 

Christmas 2024 : ख्रिसमससाठी क्युट बेबीला असे करा तयार, पाहा Ideas

Christmas 2024 साठी घराची या 8 पद्धतीने करा सजावट, वाढेल सणाचा उत्साह