Kitchen Tips : स्वयंपाकघरातली स्वच्छता टिकवण्यासाठी भांडी स्वच्छ आणि वासमुक्त ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पण भांड्यांच्या चांगल्या स्वच्छतेसाठी कोणती घासणी निवडावी, यात तुमचा गोंधळ उडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास किचन टिप्स आणल्या आहेत.

Kitchen Tips : सिंकमध्ये तासनतास पडलेली, वास येणारी भांडी कोणालाच आवडत नाहीत. आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि हायजिनिक असावं असं प्रत्येकाला वाटतं, जेणेकरून स्वयंपाक करणं सोपं वाटेल. पण बोलणं सोपं आहे, प्रत्यक्षात मात्र स्वयंपाकघरात भांड्यांचा ढिग लागतोच. आणि या भांड्यांसाठी योग्य घासणी निवडणं खूप गरजेचं आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलंत. असं म्हणतात की, भांड्याच्या घासणीमध्ये ओलावा आणि अन्नाचे कण अडकल्यामुळे बॅक्टेरिया आणि जंतू वाढतात. त्यामुळे, स्वयंपाकघरात स्वच्छता राखणं आणि भांड्यांसाठी योग्य घासणी निवडणं महत्त्वाचं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

स्टीलची घासणी: हट्टी डागांसाठी बेस्ट

जर तुम्ही एखादा मसालेदार भारतीय पदार्थ बनवला असेल, ज्याचा घट्ट मसाला भांड्याला चिकटला असेल, तर असे हट्टी डाग आणि भांड्यातला चिकटपणा काढण्यासाठी आम्ही स्टीलची घासणी वापरण्याचा सल्ला देऊ. पण, लक्षात ठेवा की ती जास्त जोर लावून घासल्यास तुमच्या भांड्यांवर ओरखडे येऊ शकतात.

रबरची घासणी: नाजूक पण प्रभावी

रबरची घासणी भांड्यांच्या प्रभावी स्वच्छतेसाठी चांगली आहे. ती हट्टी डागांवर फार प्रभावी ठरत नाही, पण भांड्यांना पटकन साफ करण्यासाठी तिचा वापर करता येतो, कारण ती साबण किंवा लिक्विड जास्त चांगल्या प्रकारे शोषून घेते. काचेची आणि सिरॅमिकची भांडी स्वच्छ करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ही घासणी लवकर सुकते, त्यामुळे त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी असते.

स्पंजची घासणी: रोजच्या वापरासाठीचा पर्याय

स्पंजची घासणी जवळपास प्रत्येक घरात सहज सापडते. चहाचं पातेलं, रोजच्या वापरातील भांडी आणि हलके डाग स्वच्छ करण्यासाठी ती चांगली आहे. पण, जर ती वापरल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ केली नाही, तर त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते.

अंतिम निर्णय

  • तुम्ही स्टेनलेस स्टीलची आणि जास्त डाग लागलेली भांडी घासण्यासाठी स्टीलची घासणी वापरावी.
  • नॉन-स्टिक, सिरॅमिक आणि नाजूक भांड्यांसाठी रबरची घासणी वापरावी.
  • रोजच्या वापरासाठी आणि हलक्या स्वच्छतेसाठी स्पंजची घासणी वापरावी.

स्वच्छतेसाठी काही टिप्स

तुमची घासणी वापरून झाल्यावर ती नेहमी चांगली स्वच्छ करा. सिंक, घासणी आणि किचनचा ओटा जंतू, बॅक्टेरिया आणि झुरळांपासून दूर ठेवण्यासाठी किचनसाठी सुरक्षित असलेल्या डिसइन्फेक्टंटचा वापर करा.