Chitra Navratri च्या उपवासासाठी खास शेंगण्याचे सॅलड, वाचा संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप

| Published : Apr 11 2024, 06:30 AM IST

Vrat Ka Salad
Chitra Navratri च्या उपवासासाठी खास शेंगण्याचे सॅलड, वाचा संपूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

चैत्र नवरात्रीला सुरूवात झाली आहे. अशातच नऊ दिवस उपवास केले जातात. यंदाच्या  उपवासासाठी शेंगदाण्याचे सॅलड कसे तयार करायचे याची रेसिपी जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप सविस्तर...

Recipe for Upvas : नुकतीच चैत्र नवरात्रीला सुरूवात झाली आहे. या दिवसात बहुतांशजण उपवास करतात. उपवासावेळी नक्की काय तयार करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडतो. यासाठी तुम्ही खास असे शेंगदाण्याचे सॅलड तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर...

सामग्री

  • 1 कप शेंगदाणे
  • अर्धा कप बारीक चिरलेली काकडी
  • अर्धा कप उकडलेले बटाटे
  • 1/4 कप डाळींब
  • 1 हिरवी मिरची
  • एक टिस्पून किसलेला ओला नारळ
  • एक टिस्पून जिरे पावडर
  • 1/4 टिस्पून काळी मिरी पावडर
  • एक टिस्पून पिंक सॉल्ट
  • अर्धा चमचा लिंबाचा रस
  • अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

  • सर्वप्रथम शेंगदाणे 30 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून घ्या. यानंतर कुकरमध्ये शेंगदाणे शिजवा.
  • उकडलेले शेंगदाणे थोडावेळासाठी थंड होऊ द्या.
  • एका बाउलमध्ये उकडलेले शेंगदाणे, काकडी, बटाटे, मिरची, लिंबाचा रस, जिरे पावडर, डाळींबाचे दाणे, काळी मिरी पावडर, पिंक सॉल्ट, किसलेला ओला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
  • अशाप्रकारे झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होईल उपवासासाठी खास असे शेंगदाण्याचे सॅलड. (Upvasasathi Shengdanyche Salad)
View post on Instagram
 

आणखी वाचा : 

उन्हाळ्यात Heart च्या आरोग्यासाठी दररोज सकाळी प्या हे ड्रिंक्स

World Health Day 2024: हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणे पुरेसे नाही? काय सांगतात तज्ज्ञ, वाचा सविस्तर...

Astro Tips : जेवणानंतर ताटात हात धुतायत? शास्रात सांगितलेय हे नियम