Lifestyle

उन्हाळ्यात Heart च्या आरोग्यासाठी दररोज सकाळी प्या हे ड्रिंक्स

Image credits: Instagram

डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबाच्या फळात अँटीऑक्सिडेंट्स असतात. खासकरून पॉलीफेनोल्स भरपूर प्रमाणात असतात. जे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रण ठेवण्यासह हृदयासाठी फायदेशीर असते.

Image credits: Getty

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये कॅटेटिन नावाचे अँटीऑक्सिडेंट्स असातत जे सूज येण्याच्या समस्येला दूर करतात. याशिवाय उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा स्तरही ग्रीन टी मुळे नियंत्रणात राहतो.

Image credits: social media

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी पोटॅशिअम आणि इलेक्ट्रोलाइट्सचा नैसर्गिक स्रोत आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठीही फायदेशीर असते.

Image credits: Getty

बेरी स्मूदी

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रासबेरीपासून तयार करण्यात आलेली स्मूदी उन्हाळ्यात पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामधील अँटीऑक्सिडेंट्स, फायबर व व्हिटॅमिनमुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते.

Image credits: social media

कलिंगडाचा ज्यूस

कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात लाइकोपीन असते, जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. याशिवाय उन्हाळ्यात कलिंगडाचा ज्यूस प्यायल्याने डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता.

Image credits: social media

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटोच्या ज्यूसमध्ये लाइकोपीन आणि अन्य अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे हृदयाचे आरोग्य राखले जाते. याशिवाय टोमॅटो व्हिटॅमिन सी आणि के चा उत्तम स्रोत आहे.

Image credits: Freepik

जास्वंदीच्या फुलाची चहा

जास्वंदीच्या फुलाची चहा पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये एंथोसायनिन आणि फ्लेवोनोइडसारखे अँक्टिऑक्सिडेंट्स असतात जे तणाव कमी करण्यासही मदत करतात.

Image credits: social media

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty