जेवणानंतर ताटात हात धुतायत? शास्रात सांगितलेय हे नियम
हिंदू धर्मात प्रत्येक काम करण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी एक काम म्हणजे भोजन करणे. यासंदर्भातील काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
बहुतांशजण जेवल्यानंतर ताटात हात धुतात. हिंदू धर्मानुसार, जेवणानंतर ताटात हात धुवू नयेत.
ग्रंथांनुसार, ताटातील जेवण देवी अन्नपूर्णेच्या प्रसादासमान असते. यामुळे कधीच जेवणाचा अपमानही करू नये.
जेवणानंतर ताटात कधीच हात धुवू नये. यामुळे देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो असे मानले जाते. याशिवाय देवी अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकते.
ज्योतिष शास्रानुसार, ज्या व्यक्ती ताटात हात धुतात त्यांचे ग्रह बिघडले जातात. यामुळे आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो.
जेवल्यानंतर ताटाला नमस्कार करत देवाचे आभार माना. याशिवाय ताटात जेवल्यानंतर थोडे पाणी सोडा.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.