सार
Chandra Grahan 2025 : 14 मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण असणार आहे. यंदा होळीच्या वेळी चंद्रग्रहण आहे. अशातच चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही असा बहुतांशजणांना प्रश्न पडला आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
14 march 2025 grahan time in India : यंदाच्या वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण आज असणार आहे. आज होळीचा सणही साजरा होत आहे. आजचे चंद्रग्रहण सिंह राशी आणि उत्तर फाल्गुन नक्षत्रात लागणार आहे. याशिवाय हे चंद्रग्रहण अत्यंत खास मानले जात आहे. कारण लाल रंगात म्हणजेच ब्लड मूनच्या रुपात आजचे चंद्रग्रहण दिसणार आहे.
ज्योतिष शास्रात, ग्रहण लागणे ही एक खगोलीय घटना असल्याचे मानले जाते. सूर्याच्या परिक्रमेवेळी जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सुर्याच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण लागले जाते. जाणून घेऊया आज भारतात चंद्रग्रहण दिसणार की नाही याबद्दल सविस्तर...
चंद्रग्रहणाची वेळ
वर्ष 2025 मधील पहिले चंद्रग्रहण 14 मार्चला सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी 03 वाजून 29 मिनिटांनी संपणार आहे. दरम्यान, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाहीये. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 6 तास 02 मिनिटे असणार आहे.
याशिवाय, होळीवेळी आलेल्या चंद्रग्रहणाच्या वेळेमध्ये ब्लड मूनचा नजारा सकाळी 11 वाजून 29 मिनिटांपासून ते दुपारी 01 वाजून 01 मिनिटांदरम्यान दिसणार आहे.
कुठे-कुठे दिसणार चंद्रग्रहण?
वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाहीये. पण उत्तर दक्षिण अमेरिका, नॉर्थ साउथ अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलया आणि आफ्रिकेत चंद्रग्रहण दिसणार आहे.
सूतक काळ मान्य असणार की नाही?
चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ लागतो. दरम्यान, चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतक काळ मान्य नाही. सूतक काळात देवी-देवतांची पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
ब्लड मून म्हणजे काय?
ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या छायेने पूर्णपणे झाकला जातो तेव्हा सूर्यावर कोणताही प्रकाश पडला जात नाही. यावेळी सूर्य काळोखात जातो. पण चंद्र पूर्णपणे काळा दिसण्याएवजी लाल रंगाचा दिसतो. काहीवेळेस पूर्ण चंद्रग्रहणाला लाल किंवा ब्लड मून असेही म्हटले जाते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)