तणाव दूर करण्यासाठी प्या या स्पेशल मसाल्याची चहा, वाचा गुणकारी फायदे

| Published : Oct 05 2024, 08:54 AM IST

Tea

सार

Special Tea for Stress : एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही तणावाखाली असल्यास डाएटमध्ये काही खास गोष्टींचा समावेश करावा. जेणेकरुन तणावापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी किचनमधील काही मसाले कामी येऊ शकतात.

Special Tea for Stress : आयुष्य फार सुंदर आहे असे प्रत्येकजण म्हणतो. पण आयुष्यात येणारे चढउतार, तणाव यामुळे व्यक्तीमध्ये तणाव वाढला जातो. तणाव अधिक वाढला गेल्यास त्याचा मानसिक आणि शारिरीक परिणाम होतो. यावेळी वेळीच तणावापासून दूर राहण्यासाठी काही उपाय केले पाहिजेत. अन्यथा झोप पूर्ण न होणे, चिडचिड, राग येणे अशा समस्या मागे लागू शकतात. एवढेच नव्हे खाण्यापिण्याच्या गोष्टींकडेही लक्ष द्यावे. डाएटमध्ये काही खास गोष्टींचा समावेश केल्यास तणावापासून दूर राहू शकता. यापैकीच एक म्हणजे तणावावर किचनमधील काही मसाले फायदेशीर ठरू शकतात.

चक्रीफूलाची चहा

  • चक्रीफूलात अँटी-ऑक्सिंडेट्स आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते.
  • चक्रीफूलात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्याने तवणाच्या स्थिती कमी होते आणि उत्तम झोप लागते.
  • चक्रीफूलात व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. यामुळे मूड फ्रेश राहतो आणि तणाव कमी होतो.
  • तणाव कमी झाल्यास मन शांत होतो आणि उत्तम झोप लागते.
  • चक्रीफूलामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. अशातच काही आजारांपासून तुम्ही दूर राहता.
  • हृदयाचे आरोग्य सुधारण्यासह आजारांपासून दूर राहण्यासाठी चक्रीफूलाची चहा फायदेशीर ठरू शकते.

अशी तयार करा चहा

  • सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या
  • यामध्ये 4-5 चक्रीफूल टाका
  • गॅसवर पाण्याचे भांडे ठेवून उकळवा
  • पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा.
  • चक्रीफूलाची चहा सकाळी उपाशी पोटी किंवा रात्री झोपण्याआधी पिऊ शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

पोटातील गॅसच्या समस्येने त्रस्त आहात? पाहा आजीच्या बटव्यातील हा खास उपाय

अस्थिर मनाच्या शांतीसाठी दररोज करा या 5 मंत्रांचा जप