शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य हेल्दी राहणे अत्यावश्यक आहे. मानसिक आरोग्य संतुलित असल्यास व्यक्ती कोणतेही काम पूर्ण मन लावून करू शकतो.
ज्योतिष शास्रात काही मंत्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या मंत्रांचा जप केल्याने व्यक्ती शारिरीक आणि मानसिक दु:खांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
मानसिक समस्यांचा सामना करत असल्यास भगवान शंकरांचा ॐ नम: शिवाय मंत्राचा जप करू शकता.
सध्या बहुतांशजण आयुष्यात तणावाचा सामना करताना दिसून येतात. यासाठी गायत्री मंत्राचा सकाळी जप करावा.
महामृत्यूंजय मंत्र आणखी एक शक्तिशाली मंत्र असून मृत्यूच्या भयापासून तुम्ही दूर राहू शकता. याशिवाय मन शांत होते.
सुख आणि मनाच्या शांतीसाठी गणपतीच्या ॐ गं गणपतये नमः मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा.
मनात कोणत्याही प्रकारची भीती, चिंता सतावत असल्यास हनुमानाचा ॐ हं हनुमते नमः मंत्राचा जप करा. यामुळे अस्थिर मन शांत होण्यास मदत होईल.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.