सार

होळीच्या सणावेळी एकमेकांना रंग लावून सणाची मजा लुटली जाते. अशातच होळीला राशीनुसार रंगांची निवड करणे शुभ मानले जाते.

Holi 2024 : यंदा रंगपंचमीचा सण येत्या 25 मार्चला साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्रात प्रत्येक राशीसाठी एक विषेश आणि शुभ रंग सांगण्यात आला आहे. अशातच होळीनिमित्त तुम्ही तुमच्या शुभ रंगाची उधळण केल्यास तुम्हाला आयुष्यात काही बदल झाल्यासारखे दिसतील. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी कोणता शुभ रंग आहे याबद्दल सविस्तर...

  • मेष राशी
    मेष राशीचा स्वामी मंगळदेव आहे. मंगळाचा रंग लाल असून त्यांची पूजा देखील लाल रंगातील सामग्रीने केली जाते. यामुळेच मेष राशीतील व्यक्तींनी लाल रंगाने होळी खेळावी. असे केल्याने मंगळ ग्रहासंबंधित शुभ फळही मिळेल.
     
  • वृषभ राशी
    ज्योतिष शास्रानुसार, वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहेत. या राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचा होळीच्या सणासाठी वापर करावा. यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी येईल.
     
  • मिथुन राशी
    मिथुन राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग हिरवा आहे. यामुळे तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळण्यासह बुद्धीचा विकास होईलय बुध ग्रहाला बुद्धी आणि वाणीचा ग्रह म्हटले जाते.
     
  • कर्क राशी
    कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग केशरी, हलका गुलाबी आणि पांढरा आहे. यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी याच रंगांनी होळी खेळावी. यामुळे आयुष्यात काही फायदे होऊ शकतात.
     
  • सिंह राशी
    सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीतील व्यक्तींचा शुभ रंग केशरी आणि लाल आहे. यामुळे सिंह राशीतील व्यक्तींनी आपल्या शुभ रंगांनुसार होळी खेळावी.
     
  • कन्या राशी
    कन्या राशीचा स्वामी बुधदेव आहे. यामुळे हिरवा रंग अथवा त्याच्या शेड्समधील रंगांनी होळी खळणे शुभ मानले जाते. याशिवाय आयुष्यात नव्या संधीही मिळू शकतात.
     
  • तुळ राशी
    तुळ राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या व्यक्तींचा रंग लाल आहे. यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींनी लाल रंगाने होळी खेळल्यास तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळू शकते. याशिवाय तुमच्यातील क्रोधही कमी होऊ शकतो.
     
  • धनु राशी
    धनु राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या व्यक्तींचा शुभ रंग पिवळा असल्याने होळी देखील याच रंगाने खेळा. यामुळ आयुष्यात वैवाहिक यश मिळू शकते.
     
  • मकर राशी
    मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीतील व्यक्तींना निळा किंवा पांढऱ्या रंगातील होळी खेळणे शुभ मानले जाते. यामुळे तुमच्यावर शनिदेवाची कृपा आणि आशीर्वाद मिळतील. याशिवाय आयुष्यातील समस्याही दूर होतील.
     
  • कुंभ राशी
    कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. या राशीच्या व्यक्तींचा शुभ रंग निळा आहे. याशिवाय होळी खेळण्यासाठी काळ्या किंवा चॉकलेटी रंगाचा वापर करू शकता. यामुळे आयुष्यात फायदा होईल.
     
  • मीन राशी
    मीन राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या व्यक्तींना पिवळा आणि केशरी रंगाने होळी खेळावी. यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद कायम टिकून राहिल.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :

Holi 2024 : होळीनिमित्त मित्रपरिवाराला Wishes, Whatsapp Messages, Images आणि शुभेच्छापत्र शेअर करत साजरा करा सण

Ranga Panchami 2024 : रंगपंचमीसाठी खास कलरफुल इडली, पाहुण्यांसह बच्चेकंपनीही होईल खुश

Holi 2024 : केमिकलयुक्त रंगांना करा गुडबाय, यंदाच्या रंगपंचमीला घरच्याघरी असा तयार करा नैसर्गिक गुलाल (Watch Video)