Joint Pain Relief Foods : सांधेदुखीचा त्रास कमी करायचाय? मग हे 7 पदार्थ नक्की खा
आपण जिने चढताना, खुर्चीवरून उठताना किंवा धावताना जेव्हा सांधे दुखतात, तेव्हाच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतो. सांधेदुखीचा त्रास वाढू नये म्हणून तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात या महत्त्वाच्या पदार्थांचा समावेश नक्की करायला हवा.

धान्य आणि कडधान्ये
धान्य, कडधान्ये, सुकामेवा आणि बिया आपल्या शरीराला आवश्यक असलेले फायबर आणि इतर पोषक घटक देतात.

हे पदार्थ टाळा
सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही तळलेले पदार्थ, जास्त साखरेचे पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) खाणे टाळले पाहिजे.
प्रोटीनयुक्त पदार्थ
तुम्ही जेवणात मूग, कडधान्ये, दूध, दही, पनीर, अंडी, मासे, कमी चरबीयुक्त मांस आणि सोया उत्पादने घ्या. हे पदार्थ स्नायूंची ताकद टिकवून ठेवतात.
व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ
लिंबूवर्गीय फळे, पेरू आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. शरीरात कोलेजन तयार करण्यासाठी ही फळे खूप महत्त्वाची असतात.
व्हिटॅमिन डी
हाडे आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन डी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
कॅल्शियमयुक्त पदार्थ
दूध, दही आणि पनीर आपल्या हाडांचे आणि स्नायूंचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात.
फॅटी फिश (चरबीयुक्त मासे)
सॅल्मन, बांगडा आणि सार्डिन माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर असते. हे मासे सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करायला मदत करतात.

