उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना सतत मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर ठेवून काहीतरी नवीन शिकायला द्यायचंय? मग ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीतले हे DIY किट्स तुमच्यासाठी बेस्ट आहेत. आर्ट, क्राफ्ट आणि सायन्सचे हे किट्स मुलांच्या सुट्टीला मजेशीर बनवतील.
उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलांची मस्ती आणि दंगा सुरू होतो. मग त्यांना दिवसभर कशात गुंतवून ठेवायचं, हा प्रश्न पालकांना पडतो. मुलांचा स्क्रीन टाइम कमी करून त्यांना काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह शिकायला मिळावं, यासाठी तुम्ही काही खास किट्स खरेदी करू शकता. बाजारात आर्ट, सायन्स आणि क्राफ्टचे असे अनेक किट्स उपलब्ध आहेत, जे केवळ मुलांचा वेळच घालवत नाहीत, तर त्यांना खूप काही शिकवतात. विशेष म्हणजे, यातील अनेक किट्स ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतात.

मुलांसाठी ज्वेलरी किट

तुमच्या मुला-मुलीचं वय ६ वर्षांपेक्षा जास्त असेल आणि त्यांना डिझायनिंगची आवड असेल, तर ज्वेलरी बुटिक किट हा एक उत्तम पर्याय आहे. यात अनेक प्रकारचे मणी आणि चार्म्स दिलेले असतात. याच्या मदतीने मुलं सहज ब्रेसलेट, नेकलेस किंवा कानातले बनवू शकतात. हे काम खूपच क्रिएटिव्ह आहे आणि मुलांना ते करायला खूप आवडतं. हे ज्वेलरी किट तुम्हाला ३०० ते ५०० रुपयांपर्यंत सहज मिळेल. सुरुवातीला तुम्हाला मुलांना थोडं मार्गदर्शन करावं लागेल, पण नंतर ते स्वतःच सगळं करू लागतील.
आर्ट आणि क्राफ्ट किट्स
जर तुमच्या मुलाचं वय ५ वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तुम्ही त्यांच्यासाठी मंडला आर्ट पेंटिंग किट, ड्रॉईंग किंवा मिनी कॅनव्हास आर्टसारखे पेंटिंग किट्स घेऊ शकता. हे किट्स तुम्हाला १५० ते ५०० रुपयांच्या दरम्यान मिळतील. यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग आणि पेंटिंगसाठी कागदही दिलेले असतात. यामुळे मुलांचा वेळ तर चांगला जाईलच, पण त्यांची कल्पनाशक्तीही (creativity) वाढेल.
सायन्स आणि लर्निंग DIY किट्स

जर तुमच्या मुलाला वेगवेगळे प्रयोग करायला आवडत असतील, तर तुम्ही त्याला सायन्स, स्पेस किंवा साध्या प्रयोगांचे सायन्स किट घेऊन देऊ शकता. यामध्ये सोलर सिस्टीम मॉडेलपासून ते पासवर्ड तयार करण्यापर्यंतचे वेगवेगळे प्रयोग करायला मिळतात. मुलांच्या वयानुसार यात वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.
फन क्राफ्ट किट्स

लाकडी फोटो फ्रेम सजवण्यापासून ते घरात दिवा (लॅम्प) बनवण्यापर्यंतचे अनेक किट्स बाजारात उपलब्ध आहेत. Amazon, Meesho सारख्या वेगवेगळ्या ऑनलाइन वेबसाइट्सवर तुम्ही मुलांसाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत असे क्राफ्ट किट्स खरेदी करू शकता. या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना या किट्सच्या मदतीने नक्कीच क्रिएटिव्ह बनवा.
