- Home
- lifestyle
- Healthy Breakfast For Weight Loss: वजन घटवायचंय? सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पदार्थ ठरतील गेम चेंजर!
Healthy Breakfast For Weight Loss: वजन घटवायचंय? सकाळच्या नाश्त्यात ‘हे’ पदार्थ ठरतील गेम चेंजर!
Healthy Breakfast For Weight Loss: नाश्ता न केल्यामुळे भूक वाढते आणि व्यायाम करण्याची ऊर्जा कमी होते. अशा परिस्थितीत, वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, हे जाणून घेऊया.

वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा 'हे' पदार्थ
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, हे जाणून घेऊया.
ओट्स
ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. यामुळे भूक कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी नाश्त्यात ओट्स खाणे फायदेशीर आहे.
उकडलेले अंडे
प्रोटीनने भरपूर असलेले अंडे नाश्त्यात खाल्ल्याने भूक कमी होते, व्यायामासाठी ऊर्जा मिळते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीन भरपूर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि भूक कमी होते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणारे नाश्त्यात ग्रीक योगर्ट खाऊ शकतात.
ब्लूबेरी
ब्लूबेरीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. हे खाल्ल्याने भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
चिया सीड्स पुडिंग
चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रोटीन असते. यामुळे भूk कमी होते आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
ग्रीन टी
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असलेली ग्रीन टी नाश्त्यात प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

