- Home
- lifestyle
- Hair Care Tips : या लालभडक फुलाचा करा वापर, केस होतील इतके जाड-मजबूत की विंचरताना दुखतील हात
Hair Care Tips : या लालभडक फुलाचा करा वापर, केस होतील इतके जाड-मजबूत की विंचरताना दुखतील हात
- FB
- TW
- Linkdin
लाल रंगाच्या तेलापासून तयार करा तेल
Hair Care Tips : ब्युटी केअर हा समस्त महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यातही एखाद्या महिलेचे सुंदर, घनदाट व लांबसडक केस (Long Hair Care Tips) पाहिल्यास; लगेचच तिच्याकडे ‘अगं तू केसांसाठी नेमके काय करतेस?’, अशी विचारपूस केली जाते.
इतरांना उपाय विचारण्याऐवजी मैत्रिणी तू सुद्धा स्वतःच्या केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतलीस ना, तर नक्कीच तुझेही केस घनदाट व मजबूत होतील. यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये या लालभडक रंगाच्या फुलापासून तयार केलेल्या तेलाचा वापर करण्यास सुरुवात करा. हे लाल रंगाचे फुल म्हणजे गणपती बाप्पाचे आवडते जास्वंदाचे फुल (Benefits Of Hibiscus Oil For Hair).
जास्वंदाची पानेही लाभदायक
जास्वंदाच्या फुले आणि पाने दोन्ही केसांच्या (How To Use Hibiscus Flower For Hair) आरोग्यासाठी लाभदायक आहेत. या फुलाच्या वापरामुळे (Benefits Of Using Hibiscus Oil For Hair) केस मजबूत होण्यासह केसांची वाढही होते. याव्यतिरिक्त केसांशी संबंधित सर्व समस्या देखील कमी होण्यास मदत मिळते. जास्वंदाच्या फुलामुळे केसांना कोणकोणते लाभ मिळू शकतात, जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…
घनदाट व लांबसडक केस
जास्वंदाच्या फुलातील (How To Make Hibiscus Oil For Hair) औषधी गुणधर्मामुळे केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. जास्वंदाच्या फुलाचा अर्क तयार करून वापरल्यास केसांची चांगली (Benefits Of Hibiscus Oil For Hair Growth) वाढ होऊ शकते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण खूप असते. जे केस दाट होण्यासही उपयुक्त ठरू शकते.
केस होतील मजबूत
जास्वंदाच्या फुलापासून तयार केलेल्या तेलाचा वापर केल्यास केसांची चांगली वाढ होईल (Hair Growth Tips In Marathi) आणि केस मुळासकट मजबूत होतील. या तेलामुळे केस चमकदार व सुंदर दिसतील. ‘व्हिटॅमिन सी’ समृद्ध जास्वंदाच्या तेलामुळे हेअर फॉलिकल्सही मजबूत होतील.
(Hair Growth Tips : लांबसडक व घनदाट केस हवे आहेत? मग वापरा या बियाणांपासून तयार केलेले औषधी पाणी)
कोंड्यापासून मिळेल मुक्तता
जास्वंदाच्या तेलामुळे डोक्याची त्वचा देखील निरोगी राहण्यास मदत मिळेल. तेलातील पोषणतत्त्वांमुळे केसांमधील कोंड्याची (Benefits Of Hibiscus Oil For Hair Dandruff) समस्या दूर होते. यामुळे स्कॅल्पला खाज येणे, त्वचेचे पापुद्रे निघणे यासारख्या समस्याही कमी होतील.
कोरड्या केसांपासून मिळेल सुटका
जास्वंद फुलाच्या पानांचा वापर केल्यास केस मजबूत होतील. कारण याद्वारे केसांना पौषक घटकांचा पुरवठा होईल व केस हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या कमी होईल. केसांचा कोरडेपणा दूर होऊन केस मऊ होतील आणि केसांवरील चमक देखील वाढले.
(Benefits Of Ghee For Hair : केसांना तूप लावल्यास मिळतील हे 9 फायदे)
केसांवर येईल चमक
जास्वंदाच्या फुलामध्ये मॉइश्चराइझिंगचे गुणधर्म आहेत. याव्यतिरिक्त फुलातील पोषक तत्त्वांमुळे केसांना एक वेगळाच नैसर्गिक रंगही प्राप्त होतो. जास्वंदाच्या फुलाची पेस्ट तयार करून वापरल्यास केस मऊ आणि चमकदार होतील.
(Dry Scalp Home Remedy : डोक्याची त्वचा कोरडी झालीय? हे रामबाण उपाय करून मिळवा समस्येतून सुटका)
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.