सार

Beauty Tips लांबसडक आणि सुंदर केस हवे असतील तर आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये या औषधी पाण्याचा समावेश करा.

Hair Growth Tips : जीवनशैली खराब असल्यास केवळ शरीरावरच नव्हे तर केसांवरही (Hair Care Tips in Marathi) वाईट परिणाम होतात. पौष्टिक आहाराचा अभाव, प्रदूषण, केमिकलयुक्त प्रोडक्ट्स, हीटिंग टुल्सचा अतिरिक्त वापर यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ केस गळणे, केस तुटणे, केस कोरडे व पातळ होणे, केसांची वाढ खुंटणे इत्यादी. 

त्यामुळे झटपट लांबसडक व घनदाट केस (Long Hair Care Tips In Marathi) मिळवण्यासाठी महिलावर्ग ब्युटी पार्लरमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात पैसा खर्चून उपाय करतात. पण यामुळे केसांचे नुकसानच अधिक होते. केसांना दीर्घकाळासाठी फायदे मिळावेत, यासाठी आपण काही नैसर्गिक व आयुर्वेदिक सामग्री वापरून घरच्या घरी केसांकरिता औषधी पाणी तयार करा. कसे तयार करायचे हे पाणी ? जाणून घेऊया सविस्तर माहिती

सामग्री :

  • मेथीच्या बिया - एक चमचा
  • अळशीच्या बिया - एक चमचा
  • तांदूळ - एक चमचा
  • कांद्याच्या बिया (Kalonji Seeds) - एक चमचा
  • पाणी - एक ग्लास

केसांसाठी औषधी पाणी कसे तयार करावे? (How To Make Homemade Shampoo)

  • एक मोठी वाटी घ्या. त्यामध्ये वरील सर्व सामग्री रात्रभर पाण्यामध्ये एकत्रित भिजत ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी दुसऱ्या वाटीमध्ये गाळा आणि तुम्ही वापरत असलेल्या शॅम्पूमध्ये हे औषधी पाणी मिक्स करावे.
  • हेअरवॉश (Natural Shampoo Recipe In Marathi) करताना अशा पद्धतीनेच या पाण्याचा वापर करावा.
  • केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी महिनाभर सलग हा उपाय करावा.

केसांना कोणकोणते लाभ मिळतील?

  • केसांची (Beauty Tips In Marathi) चांगली वाढ होते. 
  • मेथीच्या दाण्यातील औषधी गुणधर्मामुळे मुळांसह संपूर्ण केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 
  • टाळूच्या भागामध्ये रक्तप्रवाह वाढून केसांची (Long Hair Care Tips) वाढ होण्यास मदत मिळते.
  • अळशीच्या बियांमुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते आणि केस मुळासह मजबूत होतात.
  • अकाली पांढरे होणाऱ्या केसांच्या समस्येवर उपाय म्हणून फार पूर्वीपासून कांद्याच्या बियांचा वापर केला जात आहे.
  • तांदळातील औषधी गुणधर्मांमुळे केसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते.

 

View post on Instagram
 

Content Credit Instagram @rupalichouhan_19