सार

Basundi Recipe : आज (16 ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. अशातच बहुतांशजणांच्या घरी बासुंदी तयार केली जाते. पाहूयात अवघ्या 10 मिनिटात मलईदार बासुंदी कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप…

Basundi Recipe for Kojagiri Purnima 2024 : अश्विन महिन्यात येणाऱ्या शरद पौर्णिमेला म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला खीर, बासुंदी तयार करण्याची परंपरा आहे. यानंतर रेसिपी चंद्राच्या प्रकाशाखाली ठेवून त्याचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशातच आजच्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरच्याघरी अवघ्या 10 मिनिटांमध्ये मलईदार बासुंदी कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप पाहूया.

सामग्री 

  • 250 लिटर फुल्ल मलई दुध 
  • 3-4 टेबलस्पून साखर
  • 2 टेबलस्पून खवा
  • 1/4 टीस्पून वेलची पूड
  • 4-5 केशर 
  • 2-2 प्रत्येकी काजू,बदाम, पिस्ता
  • 5-6 चारोळ्या

कृती : 

  • सर्वप्रथम एका भांड्यात दूध गरम करुन घ्या. दूध गरम करताना सतत हलवत रहा. या प्रक्रियेवेळी दूध आटवून घ्या.
  • एका वाटीत खवा घेऊन त्यामध्ये भांड्यातील दूध मिक्स करुन पातळ मिश्रण तयार करा. खरंतर, खवा घातल्याने दूध लवकर घट्ट होते. यामुळे दूध अधिक आटवावे लागत नाही.
  • दूधात केशर, साखर मिक्स करुन 5 ते 7 मिनिटे उकळवून घ्या. यानंतर वेलची पूड मिक्स करुन गॅस बंद करा.
  • सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर त्यावर ड्रायफ्रुट्स घाला. बासुंदी तयार झाल्यानंतर अर्धा तास फ्रिजमध्ये थंड

VIDEO : पाहा बासुंदी रेसिपीची सोपी पद्धत

View post on Instagram
 

 

आणखी वाचा : 

Kojagiri Purnima : कोणत्या राशीला होणार धनलाभ आणि स्वप्नपूर्ती?

कोजागिरी पौर्णिमेला आरोग्य, सुख-समृद्धीसाठी करा हे उपाय