कोजागिरी पौर्णिमेला काही खास उपाय केल्याने आरोग्य सुधारले जाते. परिवारात सुख-समृद्धी येते. देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद मिळतो.
यंदा कोजागिरी पौर्णिमा येत्या 16 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी काहीजण उपवास ठेवतात. याशिवाय भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी आहे.
कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबरला सकाळी 11.36 वाजता सुरु होणार असून 17 ऑक्टोबरला 7.25 वाजता संपणार आहे.
कोजागिरी पौर्णिमा अत्यंत खास मानली जाते. या दिवशी सकारात्मक उर्जा जाणवल्या जातात.
ज्योतिषी साक्षी सिंगल यांच्यानुसार, कोजागिरीला आरोग्यासंबंधित इच्छा व्यक्त करणे फायदेशीर असते. घरी खीर तयार करुन चंद्रप्रकाशात ठेवावी.
शक्य असल्यास खीरमध्ये एक चांदीचे नाणे ठेवा. यानंतर आरोग्यासंबंधित इच्छा खीरकडे पाहून व्यक्त करा.
खीर चंद्रप्रकाशात ठेवून ॐ चंद्रमसे नम: मंत्राचा 21 वेळा जप करा.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गर्भवती महिला चंद्राच्या प्रकाशात बसल्यास बाळाला उत्तम आरोग्य लाभते.