Eggshell Reuse : अंड्याचे कवच आपण सहसा फेकून देतो. पण ही खूप उपयोगी वस्तू आहे. जळालेल्या भांड्यांपासून ते झाडांच्या वाढीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. याशिवायही याचे अनेक उपयोग आहेत.

Eggshell Uses : अंडी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रथिनेसह अनेक पोषक घटक हे खाल्ल्यानंतर शरीराला मिळतात. पण तुम्हाला त्याच्या सालीच्या फायद्यांबद्दल माहिती आहे का? अंडी फोडल्यानंतर किंवा सोलल्यानंतर आपण त्याचे कवच फेकून देतो. पण कचऱ्यात फेकली जाणारी ही वस्तू आपल्या स्वयंपाकघरापासून ते बागेपर्यंत खूप कामाची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया अंड्याच्या कवचाचे काही गजब उपयोग.

अंड्याच्या कवचाने भांडी करा स्वच्छ

अंड्याच्या कवचाने जळालेल्या भांड्यांना आपण स्वच्छ करू शकतो. साल चांगली धुवून वाळवा. नंतर वाटून पूड करा. या पूडीने जळालेल्या किंवा चिकटलेल्या भांड्या सहज स्वच्छ करता येतात. हे नैसर्गिक स्क्रबरसारखे काम करते.

झाडांसाठी फायदेशीर

अंड्याच्या कवचामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्याची पूड करून झाडांच्या मातीत टाकल्याने झाडे निरोगी आणि वेगाने वाढतात. यामुळे मातीची गुणवत्ताही सुधारते. गुलाबाच्या झाडापासून ते जाईच्या झाडापर्यंत तुम्ही ही पूड टाकून भरपूर फुले मिळवू शकता.

चेहऱ्यावर पॅक बनवण्यासाठी अंड्याच्या सालीचा वापर करा

अंड्याच्या कवचाची पूड चेहऱ्यासाठी नैसर्गिक स्क्रबरसारखे काम करते. मध किंवा एलोव्हेरा जेलमध्ये मिसळून चेहऱ्यावर पॅक म्हणून लावता येते. यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होते.

कीटकांपासून बचाव करण्यासाठीही उपयोगी

झाडांच्या मुळांजवळ अंड्याची कवच टाकल्याने कीटक आणि किडे झाडांपासून दूर राहतात. हा एक नैसर्गिक मार्ग आहे ज्याद्वारे बागेचे संरक्षण केले जाऊ शकते.

कला आणि हस्तकलेमध्ये अंड्याची साल उपयोगी पडते

अंड्याच्या कवचापासून सुंदर कलाकृतीही बनवता येतात. चित्रकला, सजावट किंवा हस्तकला प्रकल्पांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्हाला अंड्याच्या कवचाचा कलाकृती म्हणून वापर करायचा असेल, तर अंडी फोडल्यानंतर कवच चांगली स्वच्छ करा. जेणेकरून वास निघून जाईल. वाळवल्यानंतर याचा वापर करा.