सार
सध्या रिलेशनशिपची व्याख्या पूर्णपणे बदलली गेली आहे. या नात्यासाठी बदलत्या चालीरितींप्रमाणे वेगळी नावे दिली गेली आहेतच. पण रिलेशनशिपसाठी पार्टनरसाठी काही विचित्र शब्दही ठेवण्यात आले आहेत.
Year Ender 2024 5 Weird Words for Relationship : रिलेशनशिपच्या जगात वर्ष 2024 मध्ये असे काही शब्द समोर आले आहेत जे ऐकल्यानंतर थोडे विचित्रच वाटेल. झेन झी जनरेशनच्या जगात तर रिलेशनशिपला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. पार्टनरला अशा काही शब्दांचा वापर झेन झी गटातून केला जातो की, जे आपण कधीच ऐकले नाहीतच पण ऐकल्यानंतर हैराण होऊ असे आहेत.
अल्फा मॅन
अल्फा मॅन ऐकून असे वाटते की, एखादा पुरुष तगड्या पर्सनालिटीचा असेल. खरंतर, अल्फा मॅनची खरी व्याख्या म्हणजे पार्टनरवर वर्चस्व दाखवणारा किंवा थोडा कपटी असा होतो. सध्या तरुणींना अल्फा मॅन सुरुवातीला पसंत पडतात. पण अल्फा मॅनसोबतचे रिलेशनशिप जसे पुढे जाते तेव्हा आपण चूक केल्याने महिलेला वाटते.
लव्ह बॉम्बिंग
लव्ह बॉम्बिंग देखील रिलेशनशिपमधील एक नवी व्याख्या आहे. यामध्ये पार्टनरला भावनिकरुपात नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नात्याच्या सुरुवातीलाच पार्टरनचे कौतुक, गिफ्ट देणे, शानदार डेटवर जाणे अशा काही गोष्टी करुन त्याला गुलाब करण्याचा प्रयत्न केला जातो. यामागील मुख्य उद्देश म्हणजे पार्टनरला नियंत्रणात ठेवणे.
जॉम्बीइंग
वर्ष 2024 मध्ये जॉम्बीइंग शब्द तरुणांमध्ये फार वापरला जातो. याचा अर्थ असा होतो की, जो व्यक्ती तुम्हाला विसरला आहे आणि कोणतेही स्पष्टीकरण न देता तुमच्याकडे परत येण्याचा प्रयत्न करतोय. हा व्यक्ती तुमच्यासोबत आधीसारख्या सामान्य गोष्टी करु लागतो. जसे की, सोशल मीडियावर एकमेकांशी संवाद साधणे, कॉल करणे.
फिजलिंग
रिलेशनशिपमध्ये फिजलिंग असा शब्द वापरणे म्हणजे पार्टनरमधील आवड हळूहळू कमी होणे. डेटिंग केल्यानंतर काही कपल एकमेकांपासून थोडं दूर जाऊ लागतात. एकमेकांसोबत आधीसारख्या भावना राहत नाहीत. यालाच फिजलिंग असे म्हटले जाते.
वोकफिशिंग
वोकफिशिंगमध्ये व्यक्तीला फसवल्यासारखे आहे. सर्वसामान्यपणे एखाद्या सोशल किंवा राजकीय नेत्यासारखी विचारसणी असण्याचा दिखावा करणे. जेणेकरुन समोरचा व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होईल.
कुशनिंग
कुशनिंग हा अलीकडेच आलेला एक रोमँटिक ट्रेन्ड आहे. यामध्ये पार्टनर आपल्या सध्याच्या पार्टनरसोबत रोमँटिक नात्यात तणाव येत असल्याचे पाहत असल्यास त्याला दुसरा पर्याय म्हणून एखाद्याला निवडतात.
आणखी वाचा :
ऑफिससाठी परफेक्ट आहेत विद्या बालनसारख्या या 8 साड्या, खुलेल लूक
Year Ender 2024: हेल्दी त्वचेसाठी यंदा सर्वाधिक वापरलेत हे 5 घरगुती फेस पॅक