सार
चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या ते डागांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय केले जातात. यावेळी बेसनाचे पीठ, पपई, केळ, टोमॅटो अशा काही वस्तूंचा वापर त्वचेसाठी करतात.
Skin Tightening Face Packs : चेहऱ्याची त्वचा वय वाढल्यानंतर हळूहळू सैल होऊ लागते. यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाचे लक्षण दिसून येते. अशातच स्किन टाइटनिंगसाठी काही उपाय केले जातात. वर्ष 2024 च्या वर्षात हेल्दी त्वचेसाठी काही घरगुती फेस मास्क ट्रेन्डमध्ये राहिले आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
बेसन फेस मास्क
बेसनाचा वापर थंडीच्या दिवसात त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो. बेसनामुळे स्किन टाइटनिंग होण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावरील डागांची समस्याही कमी होते. बेसनाचा फेस पॅक तयार करण्यासाठी त्यामध्ये दही मिक्स करा. हा फेस पॅक चेहऱ्याला 20 मिनिटे लावून ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
पपईचा फेस पॅक
वाढत्या वयानुसार सैल झालेल्या त्वचेसाठी पपईचा फेस पॅक तयार करू शकता. पपईच्या मदतीने त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यासग त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होईल. स्किन टोन सुधारण्यासही पपई बेस्ट आहे. पपईचा फेस पॅक तयार करण्यासाठी त्यामध्ये मध मिक्स करुन चेहऱ्याला अर्धा तास लावून ठेवा. या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर काही दिवसांत फरक दिसेल.
केळ्याचा फेस पॅक
केळ केसांसह त्वचेसाठी बेस्ट मानले जाते. केळ्यामधील व्हिटॅमिन A, C, B6, पोटॅशियम त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात. याशिवाय त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या कमी होते. केळ्याच्या फेस पॅकसाठी त्यामध्ये दही मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करा. पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटे पॅक लावून पाण्याने स्वच्छ धुवा.
टोमॅटोचा रस
चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होण्यास टोमॅटोचा रस नक्कीच मदत करेल. यासाठी टोमॅटोच्या रसात काही अर्धा चमचा मध मिक्स करुन चेहऱ्याला लावा.
ब्लूबेरी फेस मास्क
ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतात. यामुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. ब्लूबेरी पल्पमध्ये अर्धा चमचा मध आणि दोन चमचे दही मिक्स करुन चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याला ग्लो येईल.
आणखी वाचा :
Year Ender 2024 : यंदाच्या वर्षी सर्वाधिक चर्चेत राहिलेली भारतातील 2 मंदिरे
थंडीच्या दिवसात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी अशी घ्या काळजी