सार
Aloo Paratha Recipe : नाश्तासाठी दररोज चहा-पोळी खाऊन कंटाळा आलाय का? अशातच नाश्तासाठी बटाट्याचा वापर करुन झटपट तयार होणारा पराठा रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर...
Aloo Paratha Recipe in Marathi : दररोज नाश्तासाठी काय करायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. सकाळच्या डब्यावेळी पोळ्या तयार केल्या जातात. पण नेहमीच पोळ्या खाऊन कंटाळा आला असेल तर यापासून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता. मसाला चपाती किंवा पराठा तयार करू शकता. जाणून घेऊया नाश्तासाठी चविष्ट अशा बटाट्याचा पराठा तयार करण्याची सोपी रेसिपी सविस्तर...
सामग्री
- 3 चमचे बेसन
- 2 कप गव्हाचे पीठ
- 2 उकडवलेले बटाटे
- 1 चमचा लाल तिखट
- 1 लहान चमचा धणे पावडर
- 3/4 चमचा हळद
- 1 चमचा जीरे पावडर
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- तूप किंवा तेल आवश्यकतेनुसार
कृती
- सर्वप्रथम उकडलेले एका भांड्यात घेऊन बटाटे स्मॅश करा. यामध्ये लाल तिखट, हळद, धणे पावडर, जीरे पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थितीत मिक्स करा. यामध्ये थोडेसे तूपही घाला.
- पराठ्याचे पीठ तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ मळून घ्या. पीठ पाच मिनिटे झाकून ठेवा. यानंतर पीठाचे लहान गोळे तयार करुन लहान पोळी तयार करा. यावर बटाट्याचे सारण घालून पुन्हा पोळी लाटून घ्या.
- तव्यावर तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थितीत भाजून घ्या. तव्यावरुन पराठा एका प्लेटमध्ये काढून सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
आणखी वाचा :
जळलेली कढई स्वच्छ करण्यासाठी 5 खास ट्रिक्स, मिनिटांत होईल काम
Recipe : क्रिमी-लज्जतदार अशी अंड्याची पारसी स्टाइल Akuri रेसिपी