भुर्जीचाच आणखी एक प्रकार म्हणजे अकुरी. पारसी नागरिकांच्या घरी अंड्यापासून तयार केलेली अकुरी रेसिपी आवडीने खाल्ली जाते.
अकुरी रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती पुढे स्टेप बाय स्टेप सविस्तर जाणून घेऊया.
4 अंडी, 2 बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेले टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल.
सर्वप्रथम एका भांड्यात सर्व अंडी फेटून घेऊन त्यामध्ये लाल तिखट घालून मिक्स करा.
पॅनमध्ये तेल गरम करुन कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या.
कांद्यामध्ये टोमॅटो, मिरची घालून सर्व सामग्री व्यवस्थितीत परतून घ्या.
गॅस बारीक करुन सामग्रीमध्ये फेटलेले अंड घालून क्रिमी होईपर्यंत ढवळा.
मिश्रणात हळद, लाल तिखट, मीठ घालून सर्व सामग्री एकजीव करा.
अकुरीच्या रेसिपीला क्रिमी टेक्चर आल्यानंतर पॅनमधून एका प्लेटमध्ये काढून पाव किंवा ब्रेडसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.