तुम्ही घरात Air Fresheners वापरता का? त्याच्याशी निगडित धोके माहिती आहेत का?
घरात सुगंध यावा म्हणून आपण रूम फ्रेशनर वापरतो. त्यामुळे घरातील वातावरणाला ताजेपणा येतो. मन प्रसन्न होतं. पण त्यामुळे काय काय धोके होतात हे माहिती आहे काय? ते जाणून घेऊया.

रूम फ्रेशनरचे धोके
घरात प्रसन्न वातावरण राहावे म्हणून आपण रूम फ्रेशनर वापरतो. पण त्यातील रसायने आपल्या श्वसनमार्गात जाऊन आरोग्याला धोकादायक ठरू शकतात. रूम फ्रेशनरमुळे कोणते धोके होतात ते जाणून घेऊया.
दमाचा त्रास
१. रूम फ्रेशनरमधील रसायनांमुळे दमा, श्वसनाचे त्रास होऊ शकतात. दमा असलेल्यांनी, लहान मुलांनी, गरोदर महिलांनी रूम फ्रेशनर वापरू नये.
२. रूम फ्रेशनरमुळे डोळे, घसा, फुफ्फुसात जळजळ होऊ शकते. जास्त वापर केल्यास लिव्हर आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो.
हार्मोन्सचे असंतुलन
३. रूम फ्रेशनरमधील रसायने हार्मोन्सच्या उत्पादनात अडथळा आणतात. त्यामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
४. रूम फ्रेशनरमुळे पाळीव प्राण्यांनाही त्रास होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास, शिंके येणे, खोकला, त्वचेची जळजळ ही काही लक्षणे आहेत.
हवेची गुणवत्ता
५. रूम फ्रेशनरमुळे हवेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात.
६. रूम फ्रेशनर वास झाकतो, पण तो पूर्णपणे काढून टाकत नाही. त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब राहते.
नैसर्गिक उपाय
घरात सुगंधासाठी नैसर्गिक उपाय:
- - उटणे, अगरबत्ती वापरा.
- - सुगंधी वनस्पती लावा.
- - घरीच स्प्रे बनवा.
- घराच खेळती हवा ठेवा.
- खिडक्या उघड्या ठेवा.

