Kodaikanal Offers : एका तिकीटावर बघता येणार चार पर्यटन स्थळे, आता संधी चुकवू नका!
कोडाईकनालमध्ये एकाच तिकिटावर अनेक पर्यटन स्थळे पाहण्याची ऑफर वनविभागाने उपलब्ध करून दिली आहे. म्हणजचे तुमचे पैसे वाचणार आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीवरील हा स्वर्ग बघण्यासाठी प्रत्येक वर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

चार ठिकाणांसाठी एक तिकीट
तमिळनाडूमध्ये ऊटी नंतरचे महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे 'डोंगरांची राजकन्या' कोडाईकनाल. धुक्याने व्यापलेले डोंगर, थंड हवामान, शांत तलाव आणि हिरवीगार जंगले यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे दरवर्षी कोडाईकनालला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.
डोंगरांची राजकन्या
कोडाईकनालमध्ये पिलर रॉक्स, कोडाईकनाल तलाव, ब्रायंट पार्क, गुना गुहा, कॉकर्स वॉक, पाइनची जंगले आणि मोइर पॉइंट अशी अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. आता वनविभागाने पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ही ऑफर सर्वांना पसंत पडण्यासारखी आहे.
आता एकच तिकीट पुरे
कोडाईकनाल वनविभागाच्या अखत्यारीतील पिलर रॉक्स, गुना गुहा, पाइनची जंगले आणि मोइर पॉइंट या चार पर्यटन स्थळांसाठी आता एकाच ठिकाणी पैसे भरून तिकीट मिळेल. म्हणजेच या चारही ठिकाणी फिरण्यासाठी एकच तिकीट घ्यावे लागेल.
मजा करा, सगळीकडे फिरा
आधी या चारही ठिकाणी वेगवेगळी तिकिटे घ्यावी लागायची. त्यामुळे पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी रांगेत उभे राहावे लागायचे आणि वेळ वाया जायचा. त्यामुळे एका दिवसात सर्व ठिकाणे पाहणे शक्य होत नव्हते.
पर्यटकांकडून कौतुक
आता पिलर रॉक्स, गुना गुहा, पाइनची जंगले आणि मोइर पॉइंट या ठिकाणी जाण्यासाठी एकाच ठिकाणी तिकीट मिळाल्याने पर्यटक आरामात फिरू शकतात. वनविभागाच्या या नव्या उपक्रमाचे पर्यटकांकडून कौतुक होत आहे.

