MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Life Lessons : साधूच्या एका शिकवणीने बदललं आयुष्य, मनःशांतीचं असं उलगडल रहस्य, वाचा कथा

Life Lessons : साधूच्या एका शिकवणीने बदललं आयुष्य, मनःशांतीचं असं उलगडल रहस्य, वाचा कथा

आपण सगळेच आयुष्यात कशाच्या ना कशाच्या मागे धावत असतो - यश, प्रसिद्धी, पैसा... पण या धावपळीत आपण हे विसरतो की काहीच कायम टिकणारं नाही. ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 11 2026, 10:10 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
साधूला घरी बोलावून जेवणाची राहण्याची सोय
Image Credit : Gemini AI

साधूला घरी बोलावून जेवणाची-राहण्याची सोय

एक साधू गावोगावी फिरून प्रवचन देत असत. एके रात्री एका तरुणाने त्यांना घरी बोलावून जेवण आणि राहण्याची सोय केली. साधू त्याच्या आदराने खुश झाले आणि त्याला श्रीमंत होण्याचा आशीर्वाद दिला. पण तो तरुण फक्त हसला आणि म्हणाला, 'स्वामी, पण संपत्ती कायम टिकणारी नसते, नाही का?' हे ऐकून साधू अवाक् झाले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आयुष्य बदललं
Image Credit : Gemini AI

आयुष्य बदललं

दोन वर्षांनी साधू परत आले, तेव्हा त्या तरुणाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्याची सगळी संपत्ती गेली होती आणि तो एका जमीनदाराकडे मजुरी करत होता. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर हसू होतंच. तो शांतपणे म्हणाला, ‘स्वामी, तुम्ही दुःखी का? तुम्हीच तर शिकवलं की चांगल्या-वाईट दोन्ही काळात देवावर विश्वास ठेवा. ही परिस्थिती कायम राहणार नाही.’

Related Articles

Related image1
Chanakya Niti : ही 4 रहस्यं बायको किंवा मित्रांनाही कधीच सांगू नका!
Related image2
Snake Dream : स्वप्नात साप दिसला? घाबरू नका, जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत
35
मन: शांती महत्वाची
Image Credit : Gemini AI

मन: शांती महत्वाची

साधू आश्चर्यचकित झाले. त्या तरुणाने संपत्ती गमावली होती, पण मनःशांती नाही. तो नशिबाला दोष देत नव्हता. उलट, त्याने नवीन परिस्थिती स्वीकारली होती आणि आनंदात जगत होता. तो तरुण म्हणाला, 'आयुष्य आपल्याला सुख आणि दुःख दोन्ही देतं. अडचण तेव्हा होते, जेव्हा आपण यापैकी काहीतरी कायम टिकेल असं समजतो.' साधूंच्या लक्षात आलं की, आपण फक्त उपदेश करतो, पण हा तरुण ते सत्य जगतोय.
45
तरुण श्रीमंत झाला
Image Credit : Gemini AI

तरुण श्रीमंत झाला

काही वर्षांनी साधू पुन्हा त्या गावात आले, तेव्हा त्यांना एक चांगली बातमी समजली. तो तरुण आता एक श्रीमंत वारसदार बनला होता! ज्या निपुत्रिक जमीनदाराकडे तो काम करायचा, त्याने तरुणाच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन आपली सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली होती. पण प्रसिद्धी आणि पैसा त्याला बदलू शकले नाहीत. त्याने साधूंना सांगितलं, 'मी यातील काही संपत्ती दानधर्मासाठी वापरतो. यातच तिचं खरं मूल्य आहे.'
55
साधूंचा आशीर्वाद
Image Credit : Gemini AI

साधूंचा आशीर्वाद

साधूंनी त्याला 'सुखी भव' असा आशीर्वाद दिला. तरुण पुन्हा हसला. 'स्वामी, तुम्ही म्हणालात की संकट कायम राहत नाही. मग सुख तरी कसं कायम राहील? ही संपत्तीसुद्धा एक दिवस जाऊ शकते.' त्याने सांगितलं की तो सुख आणि दुःख दोन्ही समान भावाने स्वीकारतो. हे ऐकून साधूंनी त्याचे हात धरले आणि म्हणाले, 'मी फक्त उपदेश करतो, पण तू सत्य जगतो आहेस. खरा संन्यासी तर तू आहेस, जो कशातही न अडकता जगतोय.'

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Sweet Potato Benefits : रताळे खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image2
Dates Soaked In Milk : दुधात भिजवलेले खजूर खाण्याचे 7 भन्नाट फायदे
Recommended image3
Blood Pressure Control Diet : बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचाय? मग आहारात करा या 7 पदार्थांचा समावेश
Recommended image4
Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं 'ही' पूर्वसूचना, दुर्लक्ष करू नका
Recommended image5
Black Coffee Benefits : रोज ब्लॅक कॉफी पिण्याचे 7 भन्नाट फायदे, जाणून घ्या
Related Stories
Recommended image1
Chanakya Niti : ही 4 रहस्यं बायको किंवा मित्रांनाही कधीच सांगू नका!
Recommended image2
Snake Dream : स्वप्नात साप दिसला? घाबरू नका, जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved