- Home
- lifestyle
- Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं 'ही' पूर्वसूचना, दुर्लक्ष करू नका
Kidney Damage Symptoms : किडनी खराब होण्याआधी शरीर देतं 'ही' पूर्वसूचना, दुर्लक्ष करू नका
आपल्या शरीरातील रक्त, अन्न आणि पाण्यातून आवश्यक पोषक घटक शोषून घेण्याचं काम किडनी करते. तसंच शरीरातील विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकून शरीर निरोगी ठेवण्यात किडनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

किडनीचा आजार
मुंबई : शरीरातील रक्त, अन्न आणि पाण्यातून आवश्यक घटक घेण्याचं आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. जेव्हा किडनीची रक्त फिल्टर करण्याची क्षमता कमी होते, तेव्हा शरीरात गंभीर समस्या निर्माण होतात. यालाच आपण किडनीचा आजार म्हणतो.

जीवनशैलीत बदल करणं गरजेचं
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात लाखो लोक क्रॉनिक किडनी डिसीजने (CKD) त्रस्त आहेत. वेळेवर उपचार न केल्यास किडनी निकामी होऊ शकते. किडनीचं मोठं नुकसान होईपर्यंत अनेकदा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे सुरुवातीची लक्षणं ओळखून जीवनशैलीत बदल करणं खूप गरजेचं आहे.
पाय आणि घोट्यांवर सूज
किडनीचं काम बिघडल्यास शरीरात अतिरिक्त पाणी साचून राहतं. यामुळे शरीराच्या खालच्या भागात, विशेषतः पाय आणि घोट्यांवर सूज येते. काही वेळा चेहरा आणि हातांवरही सूज दिसू शकते. खराब झालेली किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकण्यात अपयशी ठरते, तेव्हा ही समस्या उद्भवते.
मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणं
रक्तातील साखरेची उच्च पातळी (High Blood Sugar) हळूहळू किडनीच्या नाजूक रक्तवाहिन्या नष्ट करते. तर उच्च रक्तदाबामुळे (High BP) किडनीच्या फिल्टरिंग युनिटवर ताण पडतो. त्यामुळे नियमित तपासणी करून मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणं हा किडनीचे आजार टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
लाल रक्तपेशींची कमतरता
किडनीचं काम थांबल्यावर शरीरात टाकाऊ पदार्थ साचू लागतात. यामुळे लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण होऊन ॲनिमिया (Anemia) होऊ शकतो. याचा परिणाम म्हणून सतत थकवा येणे, चक्कर येणे आणि शारीरिक अशक्तपणा जाणवतो. यामुळे दैनंदिन कामं करणंही कठीण होऊन बसतं.
किडनी खराब होण्याची प्रमुख लक्षणं
रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावं लागणं, लघवीचा रंग गडद होणं, लघवीला फेस येणं किंवा लघवीतून रक्त पडणं ही किडनी खराब होण्याची प्रमुख लक्षणं आहेत. भरपूर पाणी पिऊनही लघवीचं प्रमाण कमी होत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
झोप घेतली तरी हा थकवा जात नाही
सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना खूप थकवा जाणवतो. कितीही झोप घेतली तरी हा थकवा जात नाही. एरिथ्रोपोइटिन (Erythropoietin) नावाचं हार्मोन किडनीचं संरक्षण करतं. जेव्हा या हार्मोनच्या पातळीत बदल होतो, तेव्हा किडनीच्या कार्यावर वाईट परिणाम होतो आणि ती खराब होऊ लागते.
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका
कामाच्या गडबडीत अनेकदा आपण लघवी रोखून धरतो. पण यामुळे मूत्राशयावर ताण पडतो. तज्ज्ञांच्या मते, यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा (UTI) धोका वाढतो. काही वेळा लघवी पुन्हा किडनीकडे ढकलली जाते. याचा थेट परिणाम किडनीच्या कार्यावर होतो आणि मुतखडा (Kidney Stone) होण्याची शक्यता वाढते.
ॲनिमिया
किडनी निकामी झाल्यामुळे फुफ्फुसांमध्ये अतिरिक्त पाणी साचू लागतं. यामुळे थोडंसं काम केलं तरी श्वास घ्यायला त्रास होतो. तसंच ॲनिमियामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, ज्यामुळे धाप लागण्याची समस्या आणखी गंभीर रूप धारण करते.
लघवीमध्ये होणारे बदल
लघवीमध्ये होणारे बदल हे किडनीच्या आजाराचं मोठं लक्षण आहे. लघवीचं प्रमाण अचानक कमी होणं किंवा लघवीतून रक्त येणं हे किडनी खराब झाल्याचं दर्शवतं. तसंच लघवीला खूप फेस येत असेल किंवा लघवी करताना त्रास होत असेल, तर हे किडनी निकामी होण्याचं लक्षण असू शकतं.
अंगाला सतत खाज
रक्तातून टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं काम किडनी करते. जेव्हा किडनीचं काम बिघडतं, तेव्हा शरीरात विषारी घटक साचू लागतात. यामुळे त्वचा खूप कोरडी पडते आणि अंगाला सतत खाज सुटते. त्वचेच्या या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
