सार
पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे. ते आपले मूळ स्त्रोत आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या येऊ शकतात. पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण जागतिक जल दिन साजरा केला जातो.
पृथ्वीवरील प्रत्येक घटकासाठी पाणी हे अत्यंत गरजेचे आहे. पाणी नसेल तर सजीव आणि झाडांचा विनाश होणे निश्चित आहे. त्यामुळेच 'जल है तो जीवन हे' असे म्हंटले जाते. सध्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि इंडस्ट्रीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. निसर्गाक्सचे सर्रास शोषण सुरु आहे त्याचा परिणाम कमी पाऊस, दुष्काळ, हवामान बदल अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
अश्या अनेक संकटाना भविष्यात मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागणार आहे. पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्ततता याविषयी जनजागृती निर्माण करण्यातला करण्यासाठी जगभरात दरवर्षी २२ मार्च हा दिवस 'जागतिक जल दिन' म्हणून साजरा केला जातो.
जागतिक जल दिनाचा इतिहास:
१९९२ मध्ये ब्राझीलच्या रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (UNCED) जागतिक जल दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्व समजून घेण्यासाठी आणि सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.
जागतिक जल दिनाचे महत्व:
जागतिक जल दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता हे आहे. त्यासाठी पाणी जपून वापरणे आणि पाण्याची जास्तीत जास्त बचत करणे, पाणी वाचवणे हे किती गरजेचे आहे, याचे महत्व लोकांना पटवून देणे हे देखील आजच्या काळात गरजेचे झाले आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या येऊ शकतात. पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना याचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे.
जागतिक जल दिनाची थीम:
'समृद्धी आणि शांततेसाठी पाणी' ही यावर्षीची थीम आहे. जगामध्ये शांतता आणि समृद्धी टिकवण्यासाठी पाणी हे सर्वात महत्वाचे असलयाचे संयुक्त राष्ट्राचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाची थीम यावर आधारित आहे.
आणखी वाचा :