Char Dham Yatra 2024 : चारधाम यात्रेला जाणार आहात? या 7 गोष्टींची घ्या काळजी

| Published : May 11 2024, 08:38 AM IST / Updated: May 11 2024, 08:39 AM IST

char dham yatra package

सार

केदारनाथ आणि यमुनोत्रीच्या मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतर चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. अशातच चार धाम यात्रेला जाण्याचा विचार करत असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरुन तुमचा चार धामचा प्रवास अगदी सुखकर होईल.

Char Dham Yatra 2024 : अक्षय्य तृतीयेच्या (10 मे) शुभ मुहूर्तावर केदारनाथ आणि यमुनोत्री मंदिराची दरवाजे भाविकांसाठी खुले करुन देण्यात आल्यानंतर चार धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षी लाखोंच्या संख्येने भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक चार धाम यात्रेसाठी येतात. उत्तराखंडमधील चार धाममधील बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचा समावेश आहे. यंदाच्या वर्षात चार धाम यात्रेचा विचार करत असल्यास पुढील काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. जेणेकरुन तुमचा चार धामचा प्रवास अगदी सुखकर आणि आनंदी होईल.

ऋतूनुसार कपडे घ्या
चार धाम यात्रेसाठी जाणार असल्यास ऋतू आणि तेथील तापमानाचा अंदाज घ्या. चार धाम यात्रेवेळी वेगवेगळ्या ऋतूनुसार कपडे पॅकिंग करण्यास विसरु नका. थर्मल्स, स्वेटर, जॅकेट्स आणि शॉल सारखे कपडे बॅगेत भरा. पावसापासून संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रुफ बॅग, रेनकोट आणि जॅकेट्स वगैरे सोबत ठेवा.

फर्स्ट एड किट
चार धाम प्रवासावेळी लहान-मोठी दुखापत होऊ शकते. यामुळे सोबत महत्त्वाची औषधेसोबत ठेवा. याशिवाय सर्दी-खोकला, डोके दुखीवरील औषधे फस्ट एड किटमध्ये ठेवा.

पर्सनल हाइजीनच्या वस्तू
चार धाम यात्रेवेळी तुम्हाला गरजेच्या वस्तू एखाद्या दुकानात उपलब्ध असतील असे नाही. यासाठी पर्सनल हाइजीनच्या वस्तू सोबत ठेवा. टुथपेस्ट, टुथब्रश आणि सॅनिटायझर बॅगेत ठेवू शकता.

पैसे आणि महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
भारतात डिजिटल सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण चार धाम यात्रेवेळी मोबाइलमध्ये नेटवर्क मिळेल असे नाही. यामुळे बॅगेत अतिरिक्त पैसे देखील ठेवा. याशिवाय चार्जर आणि पॉवर बँक बॅगेत ठेवण्यास विसरु नका.

महत्त्वाची कागदपत्रे
चार धाम यात्रेवेळी वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावे लागू शकते. यासाठी महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. चार धाम प्रवासावेळच्या गाइडलाइन्स व्यवस्थितीत वाचून त्यामध्ये नमूद केलेली कागदपत्रे सोबत ठेवू शकता.

खाण्यापिण्याच्या वस्तू
चार धाम यात्रेवेळी पायी चालत खूप प्रवास करवा लागतो. यामुळे शरिरातील उर्जा कमी होण्यासह डिहइड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून खाण्यापिण्याच्या वस्तू बॅगेत ठेवा. यासाठी सुका मेवा, पाणी आणि फळांचा पर्याय निवडू शकता.

टॉर्च ठेवा सोबत
मोठ्या प्रवासासाठी फोनच्या टॉर्चवर कधीच अवलंबून राहू नका. यासाठी टॉर्च सोबत ठेवा. अथवा मेणबत्तीही बॅगेत ठेवू शकता.

आणखी वाचा : 

Char Dham Yatra 2024 : नोंदणी न करता यात्रेला जाताय ? तर हे तुमच्यासाठी नक्की वाचा

केदारनाथच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह, मंदिराचे दरवाजे खुले करतानाचा पाहा पहिला VIDEO