सार

सणासुदीच्या काळात घरात वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. याशिवाय गोड पदार्थांशिवाय सण साजरा केल्यासारखा वाटत नाही. सणासुदीच्या काळात दररोजच्या मर्यादेपेक्षा अधिक पदार्थ खाल्ले जाते. अशातच ओव्हरइटिंगपासून दूर राहण्यासाठी पुढील काही टिप्स वापरू शकता.

Tips to control overeating : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या सणांना सुरुवात होते. आता गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात असून लवकरच नवरात्रौत्सवही सुरु होणार आहे. एकामागून एक सण साजरे केले जाणार आहेत. यावेळी घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण असण्यासह वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखता येते. घरी आलेली पाहुणेमंडळी सणासुदीला आपल्यासोबत गोडाचे पदार्थ आवर्जुन आणतात. अशातच गोड पदार्थ खाण्यावर कितीही नियंत्रण मिळवण्याचे ठरवले तरीही होत नाही.

काहीजण मनाचे ऐकून मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात खातात. सणासुदीच्या काळात ओव्हरइटिंगपासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा अपचन आणि अन्य आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. ओव्हरइटिंगमुळे वजनही वाढू शकते. पुढील काही खास टिप्सने ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहू शकता.

उपाशी पोटी घराबाहेर पडू नका
घरातून निघण्याआधी काहीतरी हेल्दी फूड अथवा स्नॅक्स खा. जेणेकरुन पोट भरलेले राहिल. अशातच घराबाहेर पडल्यानंतर पोट भरल्यानंतरही काही खावेसे वाटले तर त्यावेळी नियंत्रण करा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी ही बाब नेहमीच लक्षात ठेवावी.

घरीच तयार केलेले अन्नपदार्थ
सणासुदीच्या काळात बाहेरील अन्नपदार्थ खाण्याएवजी घरीच तयार केलेल्या पदार्थांचे सेवन करावे. कारण सणासुदीला काहीवेळेस विक्री अधिक वाढवण्यासाठी भेसळयुक्त पदार्थ विक्री केली जाते. यामुळे आरोग्य बिघडले जाऊ शकते.

नाही म्हणा
सणासुदीच्या काळात आपण मित्रपरिवार अथवा नातेवाईकांकडे गेल्यानंतर ते खाण्यासाठी जबरदस्ती करतात. अशावेळी तुम्हाला खायचे नसल्यास अथवा पोट भरलेले असल्यास थेट नाही म्हणा. कारण आरोग्य उत्तम असल्यास सणही आनंदाने साजरा करता येतो.

हळूहळू खा
माइंटफुल इटिंग सर्वाधिक उत्तम मानले जाते. आपल्या प्लेटमध्ये अत्याधिक पदार्थ घेऊन खाण्याएवजी कमी प्रमाणात फूड घेऊन हळूहळू खा. पदार्थांचा स्वाद घेत खावे असे म्हटले जाते. यामुळे पोटही भरले जाते आणि अत्याधिक खाण्याचे मनं देखील होत नाही.

प्रोटीनयुक्त स्नॅक्स खा
दीर्घकाळ पोट भरल्यासारखे राहण्यासाठी नट्स किंवा ग्रीक योगर्टसारखे प्रोटीनयुक्त स्नॅक्सला प्राथमिकता द्या.

व्यायाम करणे विसरू नका
शरिरातील अत्याधिक कॅलरी बर्न करण्यासाठी दिवसभरातून थोडावेळ व्यायाम करा. हलक्या स्वरुपाच्या व्यायामानेही हेल्दी राहण्यास मदत होते.

आणखी वाचा :

तोंडाच्या दुर्गंधीला दूर करतील हे 4 हर्ब्स, डाएटमध्ये करा समावेश

जगाला वाचवणारा देव? तमिळनाडूत उभारलेय चक्क Alien चे मंदिर