तमिळनाडूमधील सलेम येथील एका व्यक्तीने अनोखे मंदिर उभारले आहे. या मंदिरात एलियनची मुर्ती आहे.
व्यक्तीने दावा केला आहे की, एलियन देवतेकडे भक्तांना नैसर्गिक संकटांपासून वाचवण्याची शक्ती आहे.
लोगनाथन असे व्यक्तीचे नाव असून त्याने एक एकर जमिनीच्या तीन चतुर्थांश भागात एलियनचे मंदिर उभारले आहे.
मंदिरात एलियन देवतेसह भगवान शंकर, देवी पार्वती आणि देवी कालीचीही मुर्ती ठेवण्यात आली आहे.
मंदिर जमिनीच्या 11 फूट खाली तळघरात उभारले आहे.
लोगनाथन यांनी म्हटले की, स्वप्नात एलियन देवतेने दर्शन देत त्यांनी मंदिर उभारण्यास सांगितले होते.
भगवान शंकरांनी सर्वप्रथम निर्माण केलेल्या देवतांमध्ये एलियन होते असा दावा लोगनाथ यांनी केला आहे.
लोगनाथन याने असाही दावा केलाय की, मी एलियनला भेटलो आहे. एलियन मनुष्याप्रमाणे दिसतात.
तुळशीची पाने सांगतील तुमच्या घराची आर्थिक स्थिती!, जाणून घ्या
कोरियन डायट: वजन कमी करण्याचे रहस्य उलगडले?
मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे होऊ शकतो धोकादायक आजार, जाणून घ्या
गणेश विसर्जन: 7 व्या दिवसाच्या विसर्जनाचा जाणून घ्या शुभ मुहूर्त