उन्हाळ्यात Waxing केल्यानंतर त्वचेवर पुरळ आल्यास करा हे 5 घरगुती उपाय

| Published : May 31 2024, 09:38 AM IST / Updated: May 31 2024, 01:59 PM IST

Skin Care After Waxing in Summer

सार

बहुतांश महिलांना उन्हाळ्याच्या दिवसात व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर पुरळ येण्याची समस्या उद्भवते. यामुळे त्वचेला खाज येणे, त्वचा लाल होणे अथवा सूज येणे अशाही काही गोष्टींमुळे महिलांना त्रास होतो. यावर घरगुती उपाय काय याबद्दल जाणून घेऊया.

Skin Care After Waxing in Summer :  हात, पाय आण चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी महिला प्रत्येक महिन्याला पार्लरमध्ये जाऊन व्हॅक्सिंग करतात. बहुतांश महिलांचे असे म्हणणे असते की, सातत्याने व्हॅक्सिंग केल्याने हाता-पायावरील केसांची वाढ कमी होण्यास मदत होते. व्हॅक्सिंग केल्याने त्वचेवर मृत त्वचा, टॅनिंग निघण्यास मदत होते. पण उन्हाळ्यात व्हॅक्सिंग केल्यानंतर काही महिलांना त्वचेसंबंधित समस्या उद्भवतात.

उन्हाळ्यात व्हॅक्सिंग केल्यानंतर बहुतांश महिलांची अशी तक्रार असते की, त्वचेवर पुरळ येतात. यानंतर त्वचेवर खाज येणे, लाल डाग पडणे अथवा सूजही येते. यावरीलच काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

बर्फाचा वापर
व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर लाल डाग किंवा पुरळ आल्यास बर्फाचा वापर करा. बर्फ त्वचेला लावल्याने त्वचेवर येणारी खाज कमी होईल. यासाठी एका कॉटनच्या कापडामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे घेऊन त्वचेवर पुरळ आलेल्या ठिकाणी शेकवा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

एसेंशिअल ऑइल
व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेसंबंधित होणाऱ्या समस्येपासून दूर राहण्यासाठी एसेंशिअल ऑइलचा वापर करू शकता. याशिवाय लॅव्हेंडर ऑइलही बेस्ट पर्याय आहे. एसेंशिअर ऑइल त्वचेला लावल्याने थंडावा मिळतो. एवढेच नव्हे त्वचेला येणारी खाज आणि पुरळची समस्याही कमी होते.

गुलाब पाणी आणि हळद
व्हॅक्सिंग केल्यानंतर त्वचेवर येणारे दाणे आणि पुरळ कमी करण्यासाठी गुलाब पाणी हळदीचा पॅक लावू शकता. यासाठी एका वाटीत दोन चमचे हळद पावडर आणि एक चमचा गुलाब पाणी मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करुन घ्या. पेस्ट व्हॅक्सिंग केल्यानंतर 10 मिनिटे त्वचेवर लावून ठेवल्यानंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेवर होणारे रॅशेज किंवा पुरळच्या समस्येपासून आराम मिळेल.

पुदिन्यांच्या पानांचा लेप
व्हॅक्सिंगनंतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवत असल्यास पुदिन्यांच्या पानांच्या लेपचा वापर करू शकता. यासाठी एक वाटी पुदिना वाटून घेऊन त्वचेवर पुरळ आलेल्या ठिकाणी 10 मिनिटे लावून ठेवा. यानंतर त्वचा स्वच्छ धुवून त्यावर नारळाचे तेल लावा.

एलोवेरा जेल
एलोवेरा जेलमुळे त्वचेला थंडावा मिळतो. व्हॅक्सिंग केल्यानंतर खाज, पुरळ अथवा लाल चट्टे उठल्यास एलोवेरा जेलचा वापर करू शकता. खरंतर, एलोवेरा जेलमुळे त्वचेसंबंधित काही समस्या दूर राहतात. अशातच उन्हाळ्यात तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करू शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा :  
मेकअप ब्रश ते कंगवा अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंची Expiry असते? जाणून घ्या वस्तू वापरण्यासंदर्भात महत्त्वाची माहिती
Cholesterol Level राहिल नियंत्रणात, प्या हे 5 हेल्दी ज्यूस