सार
नवरा-बायकोच्या आनंदी आयुष्यात काही नातेवाईक सतत लुडबुड करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सुखी आयुष्यात वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. अशातच नातेवाईक नवऱ्याच्या विरोधात भडकवत असल्यास काय करावे आणि अशा व्यक्तींना कसे हँडल करावे याबद्दल जाणून घेऊया.
Married Life Tips : नवरा-बायकोचे नाते अत्यंत नाजूक असते. फुलाची कळी ज्याप्रमाणे खुलते त्याप्रमाणे लग्नाचे नाते टिकवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला पाहिजे. तरच वैवाहिक आयुष्यात आनंदी राहता येते. पण कधीकधी असे होते की, तुमच्या नवऱ्याच्या विरोधात काही नातेवाईक मुद्दाम आग लावण्याचा प्रयत्न करतात. यामुळे सुखी वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होते. अशात स्थितीत काही गोष्टी व्यवस्थितीत समजून घेऊन आणि विचार करुन हाताळल्या पाहिजेत. जेणेकरुन नवरा-बायकोच्या नात्यात अविश्वास निर्माण होणार नाही. जाणून घेऊया नातेवाईक नवऱ्याच्या विरोधात भडकवत असल्यास नक्की काय करावे याबद्दल सविस्तर...
संयम पाळा
ज्यावेळी काही नातेवाईक तुम्हाला नवऱ्याच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा सर्वप्रथम संयम बाळगा. लगेच उत्तर देणे टाळा. आपल्या भावनांवरही नियंत्र ठेवा आणि रागात येऊन कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. यासंदर्भात नवऱ्यासोबत बातचीत करा. तरच कळू शकते की, कोण बरोबर आहे आणि कोण नाही.
दोन्ही बाजूंचे ऐकून घ्या
नातेवाईक तुमच्याकडे नवऱ्याची तक्रार करत असल्यास त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे योग्य नव्हे. यावेळी नवऱ्याची देखील बाजून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. याशिवाय नवऱ्याच्या दृष्टीकोनातूनही काही गोष्टींबद्दल विचार करा.
नवऱ्याला पाठिंबा द्या
वैवाहिक आयुष्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी नवऱ्यासोबत कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याची ताकद ठेवा. जेणेकरुन कोणीही काही येऊन नवऱ्याबद्दल सांगितल्यास तुम्ही त्या व्यक्तीला प्रतिउत्तर देऊ शकता.
सकारात्मक संवाद ठेवा
नातेवाईकांनी नवऱ्याबद्दलची तक्रार केल्यानंतर शांत व्हा. याशिवाय नवऱ्यासोबत काही गोष्टींबद्दल सकारात्मक संवाद साधा. यावेळी एकमेकांसोबत भांडण करण्याएवजी परिस्थितीवर तोडगा कसा काढला जाईल याकडे पाहा.
मर्यादा ठरवा
नातेवाईक सातत्याने नवऱ्याच्या विरोधात तुम्हाला भडकवत असल्यास त्यांच्यासाठी एक मर्यादा ठरवा. नातेवाईकांना स्पष्टपणे सांगा, वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करणे बंद करा.
आणखी वाचा :
वयाआधीच केस पांढरे झालेत? डेली रुटीनमध्ये फॉलो करा या 5 टिप्स
दिवाळीत चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो हवाय? फॉलो करा या सोप्या टिप्स