सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागतात.
दिवाळीसारख्या सणांवेळी चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो हवा असल्यास पुढील काही सोपे उपाय करू शकता.
दह्याचा वापर चेहऱ्याची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी करू शकता. यासाठी दही चेहऱ्याला 10-15 मिनिटे लावून स्वच्छ पाण्याने धुवा.
त्वचा व्यवस्थितीत एक्सफ्लोलिएट झाल्यानंतर फेस मसाज करा. यासाठी फेशिअल मसाजचाही मदत घेऊ शकता.
यानंतर चेहऱ्याला फेस पॅक लावा. यावेळी मुल्तानी माती किंवा मलई पॅक त्वचेवर लावू शकता.
गुलाब पाणी त्वचेसाठी उत्तम मानले जाते. चेहऱ्याला गुलाब पाणी लावल्याने त्वचेवरील धूळ-माती निघून जाण्यास मदत होते आणि त्वचा उजळते.
त्वचेवर मधाचा वापर केल्यास त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचेसंबंधित काही समस्या दूर होतात.